वणीत नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचा वाढदिवसानिमित्त 4 एप्रिलला भव्य मॅरेथॉन स्पर्धा व विविध कार्यक्रम….
●दोन्ही गटांवर आकर्षक बक्षिसांचा वर्षाव होणार….
●भव्य स्पर्धा परीक्षेच्या निकालही उदयाला घोषीत
वणी (3 एप्रिल) – येथे नगर पालिकेचे नगराध्यक्ष व भारतीय जनता युवा मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या दिनांक 4 एप्रिल 2022 रोजी सकाळी 7.00वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक वणी येथे महिला व पुरुषांकरिता भव्य मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली आहे.
वणी विधानसभा क्षेत्रातील वणी, मारेगाव व झरी तालुक्यातील सर्व मुले ,मुली ,महिला व पुरुषांना या खुल्या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. यामध्ये दोन गट असून दोन्ही गटांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहे. 
महिला गटाकरिता प्रथम बक्षीस पाच हजार, द्वितीय तीन हजार, तृतीय दोन हजार चतुर्थ प्रोत्साहन पर,पाचवे प्रोत्साहनपर तसेच पुरुष गटाकरिता प्रथम दहा हजार, द्वितीय सात हजार, तृतीय पाच हजार, चतुर्थ प्रोत्साहनपर, पाचवे प्रोत्साहन पर अशी बक्षिसांची लय लूट होणार आहे. परंतु या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धकाला आधार कार्ड अनिवार्य आहे याची नोंद घ्यावी तरच या स्पर्धेत सहभागी होता येईल. 
या भव्य मॅरेथॉन स्पर्धेला उड्डाण फिजिकल करिअर अकॅडमी वणी, युवा नवरंग क्रीडा मंडळ वणी, भारतीय जनता युवा मोर्चा वणी, विधानसभा शिवजन्मोत्सव युवा मित्र मंडळ वणी, तारेंद्र बोर्डे मित्र परिवार व नवकार योगा ग्रुपचे मोलाचे सहकार्य लाभणार आहे. 
या भव्य मॅरेथॉन स्पर्धेत सहभागी होण्यासाठी गणेश असुटकर मोबाईल नंबर 8888721641, व योगेंद्र शेंडे मोबाईल क्रमांक 9823741622 यांच्याशी संपर्क साधून सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.




