शिंपी समाज महिला मंडळच्या वतीने मुकेश नामेवार यांचा सपत्नीक सत्कार …..
वणी (3.एप्रिल ):- वणी येथील शिंपी समाज महिला मंडळच्या वतीने सत्कार समारंभ सोहळ्याचे आयोजन दिनांक ०१ एप्रिल २०२२ शुक्रवारला आनंद बाल सदन येथे करण्यात आले.

त्यात वणी शहराची लेक नवनिर्वाचित अहेरी नगरपंचायतीच्या जलपूर्ती विभाग सभापती दिपाली मुकेश नामेवार आणि मुकेश नामेवार यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला तसेच बाल सदन मधील मुलांना खेळीमेळीच्या वातावरणात खाऊ वाटप करण्यात आला. 

यावेळी सत्कार समारंभ कार्यक्रमाला उपस्थिती राजु गिंनलवार, विकी पटेल, पुरुषोत्तम आक्केवार व दिलीप गटलेवार इत्यादींची प्रामुख्याने उपस्थिती लाभली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संध्या रामगिरवार यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वंदना आक्केवार, ज्योती वऱ्हाडे, लता गटलेवार, वर्षा वऱ्हाडे, शरयू पोलपेल्लीवार इत्यादींचे योगदान लाभले.



