चर्मकार समाजाची सर्वसाधारण सभा संपन्न.
●जयंती उत्सव समिती व उपसामित्या स्थापन….
वणी( 2 एप्रिल ) :– राष्ट्रीय चर्मकार महासंघ,यवतमाळ द्वारा संत रविदास चर्मकार समाज सुधार मंडळ,वणी तर्फे आयोजित वणी परिसरातील चर्मकार समाजाची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात पार पडली.
या सभेत संत रविदास महाराज जयंती उत्सव समिती-२०२ व त्यासंबंधित ११ उपसमित्या सर्वानुमते गठित करण्यात आल्या तसेच समाजबांधवांच्या सुचनेने इतर ठराव परित करण्यात आले.संत रविदास महाराज मंदिर,वणी बांधकाम,सुशोभीकरण कामाची प्रगती पाहून समाजबांधवांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी संबा वाघमारे, मधुकर हांडे, बाबाराव पिंपळकर, अनंता ढेरे, संतोष मुळे, संतोष उपाध्ये, दौलत वाघमारे, संभाजी कोरडे, दीपक हांडे, राजू वाघमारे, भारत लिपटे, संदीप वाघमारे, महेश लिपटे, योगेश सोनोने, नत्थूजी वाघमारे, सुरेश चांदेकर विजय इजवे, अक्षय टिकले, मंगेश सोनोने, प्रेमिला सोनोने, गीता वाघमारे, प्रिया दुबे,माया दुबे,दिपाली वाघमारे, गिरडकर ताई आदी समाजबांधव उपस्थित होते.



