नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांच्या वाढदिवसाचे औचित्यसाधून ” भव्य स्पर्धा परीक्षा” कार्यक्रम संपन्न
वणी (2. एप्रिल) :- वणी नगरपरिषद अध्यक्ष व भाजयुमो महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांचा वाढदिवसाचे औचित्यसाधून अटल बिहारी वाजपेयी सभागृह,वणी येथे दिनांक 2 एप्रिल शनिवारला ” भव्य स्पर्धा परीक्षा ” संपन्न झाले.
वणी येथील समस्त अभ्यास गटांचे विध्यार्थी या भव्य स्पर्धा परीक्षेत उपस्थित होते .या स्पर्धेत आयकँन करियर अकॅडमी व अभ्यासगट तसेच वणी परिसरातील जवळपास 300 चा वर विद्यार्थ्यांनी या भव्य स्पर्धा परीक्षेत भरभरुन सहभाग घेतला.
यावेळी विशेष उपस्थिती म्हणून आयोजन समितीचे तारेंद्र बोर्डे( नगराध्यक्ष तथा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष भाजयुमो) ,प्रशांत निमकर, निलेश होले (भाजयुमो, प्रदेश सचिव),शुभम डोंगे (भाजयुमो, जिल्हा- सरचिटणीस),नितीन वासेकर ( वणी विधानसभा संयोजक),
दिपक पाऊणकर ( भाजयुमो, शहर सरचिटणीस),निखिल खाडे ( वणीशहर संयोजक),वैभव मांडवकर, सोपान लाड( संचालक आयकन अकॅडमी ), गणेश आसुटकर(उड्डाण अकादमी),योगेंद्र शेंडे, गौरव देशमुख, अथर्व भोयर, सौरभ बोंडे, प्रणय गोखरे, भाऊसाहेब आसुटकर होते.
या स्पर्धेला यशस्वीतेकरिता विशेष सहकार्य आयकन अकॅडमी वणी,युवा नवरंग क्रीडा मंडळ वणी, भारतीय जनता युवा मोर्चा वणी विधानसभा, शिवजन्मोत्सव युवामित्र मंडळ वणी,नवकार योगा ग्रुप वणी व तारेंद्र बोर्डे समस्त मित्र परिवार यांनी केले.
–



