दुचाकी व गॅस सिलेंडरला हार घालून भाजप सरकारचा काँग्रेसतर्फे जाहीर निषेध…..
●जीवनावश्यक वस्तूचे भाव कमी न केल्यास देशव्यापी आंदोलनाचा ईशारा
मारेगाव (1 एप्रिल ):– केंद्र सरकार ने जीवनावश्यक वस्तू सह पेट्रोल,डिझेल,गॅस तेलाची अचानक दरवाढ केल्याने,भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी,खासदार राहुल गांधी यांच्या संकल्पनेतुन प्रदेशाध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या आदेशावरून जिल्हा अध्यक्ष वजाहत मिर्जा यांचे सूचनेनुसार माजी आमदार वामनराव कासावार यांचे मार्गदर्शनात काँग्रेसचे नेते नरेंद्र पाटील ठाकरे व अरुणा खंडाळकर यांच्या उपस्थितीत मारेगाव तालुका काँग्रेस कमेठीच्या वतीने दुचाकी व गॅस सिलेंडरला हार घालुन निदर्शने करत भाजप सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला.
केंद्रातील भाजप सरकारने सर्व जीवनावश्यक वस्तू सह पेट्रोल,डिझेल,गॅस,तेलाचे भाव वाढवून गगनाला भीडवले आहे.केंद्र सरकारने जीवनावश्यक वस्तुंचे दरवाढ करुन देशातील नागरिकांचे अक्षरशः बेहाल करून जीवन जगणे कठीण केले आहे.या सरकारला जनतेचे काही घेणे देने नसून खोटे बोलून सत्ता हस्तगत करणे, केवळ हाच उद्देश भाजप सरकारचा असल्याचा आरोप ही तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनातून काँग्रेस कमेठीने केला आहे.
पेट्रोल डिझेल चे भाव वाढल्याने शेतकऱ्यांना शेती करणे ही कठीण झाले. तसेच घरगुती गॅस तेलाचे भाव वाढल्यामूळे माता भगिनींना संसार चालविनेही आता कठीण झाले.केंद्र सरकारने त्वरित या जीवनावश्यक वस्तुंचे भाव कमी करावे न केल्यास काँग्रेस कमेठीच्या वतीने देशव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा ईशाराही तालुका काँग्रेस कमेठीच्या वतीने तहसीलदार मारेगाव यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आला आहे.
यावेळी कृ.उ.बा.स.मारेगाव चे सभापती नरेंद्र पाटील ठाकरे,जि. प.सदस्या अरुणा खंडाळकर,जेष्ठ नेते शकील अहेमद शकील कुरेशी,कृ. उ.बा. स.चे उपसभापती वसंतराव आसुटकर,जिल्हा सरचिटणीस रमण डोये,तालुका अध्यक्ष मारोती गौरकार,शहर अध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक शंकरराव मडावी,वसंत जिनिंग चे संचालक उदय रायपुरे,सरपंच तुळशीराम कुमरे,उपसरपंच प्रफुल विखनकर आदी काँग्रेस कमेठीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



