अखेर पाच ग्रामस्थांचे बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश मिळाले……
अखेर पाच ग्रामस्थांचे बळी घेणाऱ्या वाघाला जेरबंद करण्याचे आदेश मिळाले……..
कोणत्याही प्रकारचा मानवी संपर्काचा ठसा उमटणार नाही याची काळजी घेऊनच वाघाला बंद करण्याचे प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीव ) यांचे आदेश………..
चंद्रपूर : ताडोबा -अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या चिमूर तालुक्यातील कोलारा परिसरातील मागील काही दिवसांपासून ऐकून पाच ग्रामस्थांचे बळी घेणाऱ्या कोटी-१ या वाघाला बेशुद्ध करून जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीव ) नितीन काकोडकर यांनी ताडोबा प्रशासनाला दिले आहेत.
ताडोबा प्रकल्पामध्ये येत असलेल्या चिमूर तालुक्याच्या ठिकाणाहून १०कि. मी. अंतरावर असलेल्या कोलारा या परिसरातील गेल्या तीन महिन्यात एका पाठोपाठ एक असे ऐकून पाच जणांचे बळी गेले आहेत. विशेष म्हणजे या एकाच परिसरातील पाचही व्यक्तींचे बळी कोटी-१ या वाघानेच घेतले आहेत.
दरम्यान वनविभागाने शोध मोहीम राबवून बळी घेणाऱ्या वाघाचा शोध घेण्यात आला. विशेष म्हणजे या भागात लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपच्या अहवालानुसार या पाचही व्यक्तींचा बळी घेणारा कोटी -१ हा एकच वाघ आहे. असे निष्पन्न झाल्यामुळे त्या वाघाला बेशुद्ध करण्याचे इंजेक्शन देऊन जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनरक्षक (वन्यजीव ) नितीन काकोडकर यांनी ताडोबाचे क्षेत्र संचालक एन. आर. प्रवीण यांना दिले आहेत. तसेच त्या वाघाला जेरबंद करतेवेळी कोणत्याही प्रकारचा मानवी संपर्काचा ठसा उमठणार नाही. याची विशेष काळजी घेण्याचेही आदेश यावेळी नितीन काकोडकर यांनी दिले आहेत.
हे आदेश ३०जुलै २०२० प्रर्यन्त वैध राहणार आहेत. यामध्ये विशेष बाब म्हणजे या वाघाला जेरबंद करावे अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी काही दिवसांपासून लावून धरली होती. वाघाला वनविभाग बंद करणार नसेल, तर आम्हीच त्याचा बंदोबस्त करणार, असा इशारा दिल्या नंतर ताडोबा व्यवस्थापनाने तसा प्रस्ताव प्रधान मुख्य वनरक्षक यांचेकडे पाठविला होता. त्यानंतर हे आदेश निर्गमीत करण्यात आले आहेत.
बळी ठरलेल्या व्यक्तींचे नावे : १)राजेश दडमल रा. कोलारा. २)फेब्रुवारी महिन्यात बालाजी वाघमारे रा. कोलरा ३)एप्रिल महिन्यात यमुनाबाई गायकवाड रा. सातारा (कोलारा ) ४)मे महिण्यात लीलाबाई जिवतोडे रा. कोलारा ५)४जून राज्यपाल नागोसे रा. ब्राह्मणगाव (कोलारा )



