रक्तदात्यांना खासदार अशोक नेते यांच्या हस्ते दिवालघडी, सनीटरायजर व मास्कचे वितरण
रक्तदात्यांना खासदार अशोक नेते यांच्या हस्ते दिवालघडी, सनीटरायजर व मास्कचे वितरण
आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून रक्तदात्यांना किट व भेटवस्तू देऊन सन्मानित केले
दि 31:5:2020 रोज रविवार ला सावली येथे कृषी उत्पन्न बाजार समिती येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते माननीय श्री सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या सूचनेनुसार आज दिनांक ७ – ६ -२०२०रोज रवीवार कृषी उत्पन्न बाजार समिती सावली येथे नियमाच्या अधीन राहून त्या रक्तदात्यांना किट व प्रशस्तीपत्र तसेच भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले भारतीय जनता पार्टी सावली तालुक्याच्या वतीने खासदार श्री.अशोकजी नेते तालुका अध्यक्ष अविनाश पाल , तालुका महामंत्री सतीश बोम्मावार, शहर अध्यक्ष चंद्रकांत संतोषवार, जीप.सदस्य संतोष तगंडपल्लीवार, जीप सदस्य योगिताताई दबले, पंस.सदस्य छायाताई शेंडे, पंस.सदस्य गणपत कोठारे, देवराव सा मुद्दामवार,प्रकाश पा गद्दामवार,पूनम झाडे, अर्जुन भोयर, मानसी लाटेलवार यांच्या उपस्थितीत खासदार अशोकजी नेते यांच्या हस्ते किट,प्रशस्तीपत्र व भेट वस्तूचे वितरण करण्यात आले. या लोकहिताच्या कार्याला रक्तदात्यांनी भरभरून सहकार्य केल्याबद्दल माननीय माजी मंत्री.आमदार श्री सुधीरभाऊ मुनगंटीवार,खासदार.अशोकजी नेते, माजी आमदार.अतुलभाऊ देशकर व भाजपाचे संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी रक्तदात्यांनी आभार मानले.




