गट्टा जांभिया येथे नक्षल्यांनी दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करुन वनपरिक्षेत्र कार्यालयाची केली जाळपोळ,
गट्टा जांभिया येथे नक्षल्यांनी दोन वनरक्षकांना बेदम मारहाण करुन वनपरिक्षेत्र कार्यालयाची केली जाळपोळ,
जिल्हा प्रतिनिधी / गडचिरोली :– एटापल्ली तालुक्यातील भामरागड वन विभागाअंतर्गत येणाऱ्या गट्टा जांभिया येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाची काल रात्री १० ते १२ वाजताच्या सुमारास सशस्त्र नक्षल्यांनी जाळपोळ करुन दोन वनरक्षकांना बेदम मारहाण केल्याची घटना घडली. नक्षल्यांनी अशा प्रकारे अनेक जाळपोळ केली आहे मात्र आता त्यांनी आपला मोर्चा वन विभागाच्या कार्यालयाकडे वळविला. नक्षल्यांनी यावेळी तेथे उपस्थित दोन वन कर्मचाऱ्यांना धमकी दिली व त्यांना कार्यालयाचे कुलुप काढण्यास सांगीतले त्यानंतर नक्षल्यांनी आतमध्ये प्रवेश करत कागदपत्र तसेच अन्य साहीत्याला आग लावली. आगीत इमारतीचा काही भाग जळून खाक झाला . त्यासोबतच तिथे असलेल्या दोन वनरक्षकाला ही बेदम मारहान करण्यात आली असून त्यांच्या कडे असलेले मोबाईल संच नक्षल्यांनी आपल्या सोबत घेऊन गेल्याची माहिती आहे.या संदर्भात गट्टा वनपरिक्षेत्रधीकारी यांना या घटनेसंदर्भात माहिती घेतली असता त्यांनी जाळपोळीच्या घटनेला दुजोरा दिला आहे . मात्र घटनेचा अधिक तपशील मिळवण्यासाठी ते प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले आहे . या संदर्भात गट्टा वनपरिक्षेत्रधीकारी यांना या घटनेच्या संदर्भात माहिती घेतली असता त्यांनी जाळपोळीच्या घटनेला दुजोरा दिला आहे . विशेष म्हणजे गट्टा येथे पोलिस मदत केंद्र असतानाही नक्षलवाद्यांनी गावात येऊन वन कार्यालयाची जाळपोळ केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.



