दहावी बारावीच निकाल कधी लागणार? बोर्डाने दिले स्पष्टीकरण…
दहावी बारावीचा निकाल कधी लागणार? बोर्डाने दिले स्पष्टीकरण…
राज मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली माहिती…….
संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीचा या वर्षीचा निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थी व पालक वर्गाचे डोळे लागले आहे. सर्व साधारणपणे हे दोन्ही निकाल दरवर्षी मे महिन्याच्या अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला लागणारे दहावी – बारावीचे निकाल यंदा कोविड-१९ च्या लॉकडावूनमध्ये अडकला आहे. गेल्या आठवडाभरापासून या निकालासंदर्भात प्रसारमाध्यमांत आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या बातम्या प्रसारित होत आहेत. त्यासंदर्भांत राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी स्पष्टीकरण दिल आहे.
राज्यातील इयत्ता दहावी – बारावीच्या उत्तरपत्रिकांचे संकलन आणि निकाल तयार करण्याचे काम सुरु आहे. अद्याप निकालाची कोणतीही तारीख ठरलेली नाही. त्यामुळे विद्यार्थी – पालकांनी निकालांच्या कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. राज्य मंडळाकडून निकालाची तारीख अधिकृतरीत्या जाहीर करण्यात येईल, अशी माहिती राज्य मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी दिली आहे.
या वर्षी कोरोना विषाणू संसर्गच्या पार्श्वभूमीवर यंदा निकाल जाहीर होण्यास थोडा उशीर होणार आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून समाजमाध्यमांवर निकालांच्या तारखांची चर्चा सुरु आहे. या पार्श्वभूमीवर रा. म. अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी निकालाची तारीख अद्याप निश्चित झाली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
यंदा सुमारे १३ लाख विद्यार्थ्यांनी बारावीची तर सुमारे १७ लाख विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीची परीक्षा दिलेली आहे. गेल्या वर्षी रा. म. दहावीचा निकाल ८जून तर बारावीचा निकाल २८ मे रोजी जाहीर करण्यात आलेला होता..



