Vidarbh24News

Latest Online Breaking News

कोळसा खदानीतील मातीच्या ढिगार्‍यामुळे जवळपासच्या गावांना मोठा धोका:- राजू झोडे

कोळसा खदानीतील मातीच्या ढिगार्‍यामुळे जवळपासच्या गावांना मोठा धोका:- राजू झोडे

शासनाला निवेदन देऊन उलगुलान संघटनेने वेकोली प्रशासनाला दिला आंदोलनाचा इशारा

राजूरा/सास्ती:– वेकोलिच्या सास्ती ओपन कास्ट कोळसा खाणीतील निघालेली माती ही सास्ती गावाच्या पश्चिमेला असलेल्या गावाच्या महसुली नाल्याच्या बाजूला मोठ्या प्रमाणात टाकण्यात येत आहे. वेकोलि प्रशासनाने महसूल विभाग व पर्यावरण विभाग यांची कोणतीही परवानगी न घेता नाल्यांमध्ये माती टाकून रस्ता तयार करत आहेत. नाल्यांमध्ये माती टाकल्याने नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झालेला असून नाल्यामध्ये मोठे मोठे दगड व माती जमा झालेली आहे. नाल्याचा नैसर्गिक प्रवाह बंद झाल्यामुळे पावसाळ्यात पाणी जमा होऊन पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सास्ती, गोवरी, कडोली बाबापुर, बल्लारपुर, मानोली, कोलगाव अशा नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. तसेच नदीकाठच्या शेतीचीही मोठी नुकसान होण्याची शक्यता आहे. पाण्याचा प्रवाह बंद केल्यामुळे सास्ती या गावाला पाणी पुरवठा करण्यासाठीही अडचण जात आहे.

वास्तविक पाहता नदी किंवा नाल्याच्या वाहत्या प्रवाहात माती टाकने व प्रवाह बंद करणे हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा असून यामुळे पर्यावरणाला सुद्धा मोठी हानी होत आहे.सदर प्रकरणाकडे जाणीवपूर्वक सास्ती ग्रामपंचायतीने व वेकोलि प्रशासनाने दुर्लक्ष केलेले दिसत आहे. सदर प्रकरण गंभीर स्वरूपाचे असून यामुळे मोठी नैसर्गिक हानी व जीवित हानी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे याला जबाबदार वेकोली मुख्य महाप्रबंधक यांच्यावर गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करावा व टाकलेली माती काढून नाल्याचा प्रवाह पूर्ववत करावा या मागणीसाठी उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाला निवेदन दिले.

जर एका आठवड्याच्या आत वरील मागणी पूर्ण झाली नाही तर या विरोधात उलगुलान संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी दिला. निवेदन देतांना राजू झोडे,अनिश मानकर, संघपाल देठे, पुरुषोत्तम नळे,साहिल झाडे, प्रशांत वाघमारे, इंद्रदास मेश्राम, निखिल मावलीकर,श्रीधर रावला तथा अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!