शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करा रेगुंठा येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देवूण केली मागणी
शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करा रेगुंठा येथे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देवूण केली मागणी.
सिरोंचा:-सिरोंचा तालुक्यातील रेगुंठा परीसरात धान उत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात होत असून अजुनही उत्पादन झालेल्या शेतकर्यांचा धान विक्री केला नाही म्हणुन रेगुंठा येथे शासनाने तातडीने धान खरेदी केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी रेगुंठा येथील नागरीकांनी केला आहे.
दोन तीन महिने झाले कोविड 19 आजाराच्या लाॅकडाऊन असल्यामुळे कमीत कमी 60 किलोमिटर चे अंतर पार करून तालुक्यातील केंद्रावर धान विक्री करण्यास घेउन जाने कठीण होत आहे म्हणुन शेतकर्यांना मोठे संकट कोसळले आहे हंगामाला सुरूवात होण्यापुर्वी धान्य विकुन पैसे गोळा करणे आवश्यक असते तसे न झाल्यास पुढील हंगाम करने शक्य होत नाही म्हणुन तात्काळ शासनाने शासकीय धान खरेदी केेंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी अहेरी विधनसभा चे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांना निवेदन देऊन रेगुंठा परीसरातील शेतकरी मागणी केले आहे यावळी स्वामी चुक्कावार, चंदु कडालवार, तिरूपती बंडमवार, राकेश सुंकरी, व शेतकरी उपस्थित होते



