अखेर त्या युवकाचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह

अखेर त्या युवकाचा कोरोना अहवाल आला निगेटिव्ह
चंद्रपूर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार बाहेर जिल्ह्यातून आणि बाहेर राज्यातून आलेल्या वक्तींचे स्वाब नमुने दिनांक ०२ जून रोजी तपासणी करिता पाठविण्यात आले होते. यामध्ये सावली तालुक्यातील कवठी या गावचे २३ वर्षाच्या यांचे अहवाल दिनांक ०४ जून रोजी निगेटिव्ह आले. हा बंगलोर वरून आलेला होता. सदर व्यक्तीचे अहवाल येण्याअगोदर गावामध्ये खळबळ माजली होती आणि गावामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु सदर वक्तीचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याची बातमी माहित होताच आता गावामध्ये आनंदाच वातावरण तयार झालं आहे ग्रामपंचायत कवठी यांचे कडून नागरिकांना कळविण्यात येत आहे कि रेड झोन किंवा बाहेरून आलेल्या व्यक्तीची माहिती स्थानिक प्रशासनाला किंवा तालुका प्रशासना ला द्यावी आणि शासना ने सांगितलेल्या नियमांचे काटेकोर पणे पालन करावे