सलून दुकान उघडण्याची परवानगी द्या.
सलून दुकान उघडण्याची परवानगी द्या. – मनसे
*महेश काहिलकर*/ *विदर्भ 24 न्यूज*
*शहर प्रतिनिधी*- *चंद्रपूर*
*97632 00933*
चंद्रपूर- लॉक डॉऊन शिथिल केल्यानंतरही सलून व्यवसाय बंद करण्याचे आदेश दिल्ले. परिणामी सलून व्यवसायावर उपासमारीची वेळ आली आहे.त्या मुळे सलून दुकान उघडण्याची परवानगी द्यावी.अशी मागणी मनसे शहर अध्यक्ष मंदिप रोडे यांचा नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तसेच खासदार बाळू धानोरकर यांना दिलेल्या निवेदन मागणी केली.
मागील तीन महिन्यापासून लॉक डाऊन मुळे सलून व्यवसाय बंद आहे. त्या मुळे दुकांचा किराय, घर किराया, घर खर्च, मुलांचा शिक्षणाचा खर्च कसा भागवायचा असा गंभीर प्रश्न सलून कारागिरांना पडला आहे. मात्र सर्व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देऊन सलून व्यवसायाला बंदी घातली आहे. त्या मुळे सर्व कारागिर आर्थिक अडचणीत असल्याने त्यांना विशेष पॅकेज द्यावे. या साठी मनसे शहर अध्यक्ष मंदिप रोडे यांचा नेतृत्वात जिल्हाधिकारी व खासदारांशी चर्चा करून मागण्याचे निवेदन देण्यात आले. या वेळी मनवीसे जिल्हाअध्यक्ष राहुल बालमवार, शहरसचिव सुमित करपे, शाखा अध्यक्ष संगीता धात्रक, विभाग अध्यक्ष स्वाती राऊत, मनविसे तालुका अध्यक्ष विवेक धोटे, नितीन कुमरे आधी उपस्थित होते.


