Vidarbh24News

Latest Online Breaking News

गर्भवती महिलेची हत्या की आत्महत्या ?

गर्भवती महिलेची हत्या की आत्महत्या?

मयत महिलेच्या आई-वडिलाचा हत्या केल्याचा आरोप 

शेतातील विहिरीत आढळलेल्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करताच केला अंत्यविधी 

सावली तालुक्यातील आणि पाथरी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या कसरगाव येथील एका सात महिने गर्भवती असलेल्या महिलेची हत्या केल्याचा आरोप जिबगाव येथील तिच्या आईवडिलांनी प्रत्यक्षरित्या केलेला आहे. लोभीका महेश भोयर 23 वर्ष राहणार कसरगाव असे मृतक महिलेचे नाव आहे. सविस्तर असे की, मृतक लोभीका राहणार जिबगाव हिचा विवाह तीन वर्षांपुर्वी महेश भोयर राहणार कसरगाव याच्याशी झाला होता ,सांसारिक परिवार योग्य रीतीने चालू असतानां कुठे माशी शिंकली कुणाचं ठाऊक पतिकडील कुटुंबात वादंग निर्माण झाले आणि सात महिने गर्भवती असलेल्या लोभीकाला आपला जीव गमवावा लागला. एवढी मोठी घटना मृतक महिलेच्या कुटुंबात घडली असतांना याची साधी कल्पना जावईबुवांकडून जिबगाव येथिल सासरच्या कुटुंबियांना कडू शकत नाही. सदरची घटना जिबगाव येथिलच कसरगाव दिलेल्या पुतणीकडून कळते या बाबत शंका व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती होताच जिबगाव येथील आई-वडील कसरगाव येथे मुलीच्या शोधात नदीकडे जातात आणि जावईबुवांकडून पत्नीचे शव मिळाल्याची माहिती मिळते मग तिचा दफनविधी केला जातो मग मुलीने आत्महत्या केली असेल तर तिची तक्रार ठाण्यात का दिली नाही आणि तिच्या मृतदेहाचा परस्पर विल्हेवाट का लावण्यात आला या बाबत जिबगाव येथील आई-वडील, काका-काकू यांच्याकडून शंका व्यक्त केली जात आहे, आम्हाला मुलीच्या शोधासाठी नदीकडे पाठवून आमच्या मागे मृतदेह कसा सापडतो याबाबत अनेक तर्कवितर्क आईवडीलांकडुन लावले जात आहे,
त्यामुळे आमच्या मुलीची आत्महत्या नसुन जावई आणि त्यांच्या कुटुंबाकडून केलेली हत्याच आहे असा स्पष्ट आरोप आईवडीलांकडून प्रत्यक्ष केला जात असून जावई आणि त्याच्या कुटुंबावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मृत महिलेच्या आई-वडीलांकडून केली जात आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!