Vidarbh24News

Latest Online Breaking News

खाजगी शाळेची फी माफ करण्यासंबंधी शिक्षणधिकारी यांना निवेदन

खाजगी शाळेची फी माफ करण्यासंबंधी शिक्षणधिकारी यांना निवेदन

आशिष यमनुरवार/ विदर्भ 24 न्युज
शहर  प्रतिनिधी, राजुरा. 
संपर्क – 88559 94001

चंद्रपूर- जिल्ह्यातील खाजगी शाळा व कॉन्व्हेट लॉक डॉऊन काळात पालकांकळून जबरदस्तीने फी वसुली करत असल्या बाबत पालक वर्गात असंतोष निर्माण होत असून त्या संदर्भात तक्रार प्राप्त होत असून सर्व माध्यमांचा खाजगी शाळांना फी माफ करण्याबाबत सकारात्मक निर्णय द्यावे अशा आशयाचे निवेदन विठाई बहुउद्देशीय संस्थे तर्फे जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.
सद्या संपूर्ण जगात कोरोना प्रादुर्भावामुळे देशातील आर्थिक व्यवहार ठप्प झाले असून मध्यवर्गीय तसेच गोरबरीब .जनतेला कुटुंब चालविण्यासाठी कसरत करावी लागत आहे. अशातच जिल्ह्यातील खाजगी शाळा व कॉन्व्हेट द्वारा लॉक डॉऊन काळात सुद्धा वसुली साठी तगादा लावत आहे. मागील तिन महिन्यापासून सामान्य व गरीब पालक वर्ग दोन वेळ चा अन्नासाठी धावपळ करीत असून अशा गंभीर परिस्थितीत हा पालक वर्ग शाळेची फी कसा भरणार..? अशी गंभीर समस्या त्याचा समोर उभी आहे.
जिल्ह्यातील काही शाळा कॉन्व्हेट कळून पालकांना त्वरित शाळेची फी भरा आणि निकाल घ्या अशी प्रतक्ष सूचना देण्यात येत असल्याची माहिती बरेच पालकांनी बोलून दाखवली. आधीच पालक लॉक डॉऊन मुळे बुडालेल्या रोजगाराचा समस्येने आर्थिक आर्थिक खाईत गेला आहे. अशा परिस्थिती जगावे की मरावे असा गंभीर प्रश्न लोकांसमोर उभा झाला आहे . त्या मुळे ह्या परिस्थितीत कडे त्वरित लक्ष देऊन खाजगी शाळा व कॉन्व्हेट संचालकांशी चर्चा करून मागील 3 महिन्याची शालेय फी माफ करण्यात यावी अशी मागणी *विठाई बहुउद्देशीय संस्थे* तर्फे जिल्हाधिकारी तसेच शिक्षणाधिकारी यांना निवेदांचा माध्यमातून करण्यात आले.
यावेळेस संस्थेचे अध्यक्ष महेश काहिलकर, चेतन जनबंधु, दिनेश जुमडे, संदीप कष्टी, सोनल धोपटे, वैभव माकडे, स्नेहल गावंडे इत्यादींची उपस्थिती होती.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!