जिल्ह्याच्या सीमारेषेवर बांधल्या रेशीमगाठी
जिल्ह्याच्या सीमारेषेवर बांधल्या रेशीमगाठी
कोरोना योद्ध्यांना सुरक्षा किटचे वाटप
रुपचंद लाटेलवार /विदर्भ 24 न्युज
मुख्य संपादक
आरमोरीचे सहाय्यक गटविकास अधिकारी मुक्तेश्वर कोमलवार यांची जेष्ठ कन्या कु. शितल हिचा लग्न शंकर चिटलवार यांचा मुलगा कु. मंगेश यांच्या सोबत जानेवारीत जुळला होता. कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन ४ सुरु झाला. नवरी मुलगी गडचिरोली जिल्ह्यातील आणि नवरदेव मुलगा चंद्रपूर जिल्ह्यातील येथेही जिल्ह्याच्या सीमारेषा आडव्या आल्या. या सीमारेषेला मात देण्यासाठी म्हणून कोमलवार व शिटलवार परिवाराने जिल्ह्याच्या सीमारेषेवरच लग्न करायचे ठरविले. दिनांक २९ मे रोजी गडचिरोली-चंद्रपूर जिल्हा सीमेवरील वैनगंगा नदीकाठावरील निसर्गरम्य परिसरातील मधुबन लान (Lawn) येथे लग्नसमारंभ पार पडले.
या लग्नसमारंभाला आरमोरीचे तहसिलदार कल्याणकुमार डहाट, गटविकास अधिकारी चेतन हिवड, पोलीस निरीक्षक दिगांबर सूर्यवंशी, महिला व बालकल्याण अधिकारी नागेश ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनद ठिकरे, गावातील सरपंच, पोलीस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष व नातेवाईक उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिगांबर लाटेलवार यांनी केले.
लग्नसमारंभामध्ये बडेजावपणा नव्हता. ना बँडबाजा ना शहनाई अत्यंत साध्यापद्धतीने पार पाडण्यात आले. विशेष म्हणजे कोणाकडून आहेर किंवा बक्षीस स्वीकारल्या गेलं नाही याउलट नवरी व नवरदेवाकडून तालुका आरोग्य अधिकारी डॉ. आनंद ठिकरे यांना कोरोना योद्ध्यांना पुरविण्यासाठी सुरक्षा कीटचे वाटप करण्यात आले. अशापद्धतीने कोमलवार परिवाराकडून समाजाला एक आदर्श घालून दिला.




