नवरदेव गेला अन नवरीला घेऊन आला
नवरदेव गेला अन नवरीला घेऊन आला
नितीन गोरडवार / विदर्भ 24 न्युज
ग्रामीण प्रतिनिधी, पेंढरी मक्ता
नवरदेव निखील मुरलीधर कळस्कर राहणार सायखेडा जिल्हा चंद्रपूर याचे विवाह नवरी कांचन रामदास झरकर राहणार मसली जिल्हा गडचिरोली हिच्याशी जानेवारी महिन्यामध्ये विवाह जुळले होते. साखरपुडा पण झाला होता. त्यांच्या लग्नाची तारीख २८ मार्च ठरली होती. परंतु 24 मार्चपासून संपूर्ण देशात कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे यांच्या लग्ना वर विघ्न आले.लॉकडाऊनची तारीख आणखीआणखी वाढत होती लॉकडाऊन ४ सुरु झाला. शेवटी त्यांनी ठरवलं की आपल्याला २७ मे लाच लग्न करायचं आहे. परंतु येथेही जिल्ह्याच्या सीमारेषा आड आल्या. दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी ऑनलाईन परवानगीची आवश्यकता भासते असे सांगण्यात आले आणि नवरदेव ऑनलाईन परवानगीची घेण्यासाठी गेला. तिथेही चारचाकी वाहनामध्ये मर्यादित सीट(लोक) बसवता येईल असे सांगण्यात आले शेवटी नवरदेवाने असे ठरविले की, स्कॉर्पिओ गाडीत एक चालक व स्वतःच जायचे व नवरीला एकटीलाच घेऊन यायचे असे ठरले. २७ मे मसली येथे अवघ्या २० व्हराडांच्या उपस्थितीत सामाजिक अंतराचे पालन करून सुखरूप लग्न लावण्यात आले.