दहा वर्षाच्या वैभवने बनविला कुलर
दहा वर्षाच्या वैभवने बनविला कुलर
लॉकडाऊन चा असा केला उपयोग
उद्धव पुरी/ विदर्भ 24 न्युज
शहर प्रतिनिधी, गडचांदूर
वैभव विनोद खंडाळे हा 10 वर्षाचा मुलगा अंबुजा विद्या निकेतन गडचांदूर येथे चौथ्या वर्गात शिक्षण घेत आहे. सध्या लॉकडाऊन असल्यामुळे शाळेला सुट्ट्या आहेत. सुट्यामध्ये वेळ कसा घालवायचा म्हणून घरीच असलेल्या कॉम्पुटर इन्स्टिट्यूट चा मध्ये नवनवीन प्रयोग करून youtube च्या सहाय्याने त्याने एक छोटासा कुलर बनविला आहे. कॉम्पुटर च्या निकामी साहित्यापासून कुलर बनविला त्या कुलरमध्ये पाणी टाकण्याची सोय पण आहे. त्याच्या या कृतीचे घराशेजारील व्यक्ती कौतुक करीत आहे. छोट्या मुलाच्या कल्पकतेला प्रोत्साहन देत आहेत.




