एकाच कुटुंबातील एकाच दिवशी तीन व्यक्तीचा वाढदिवस
एकाच कुटुंबातील एकाच दिवशी तीन व्यक्तीचा वाढदिवस
वर्षा यलचलवार /विदर्भ 24 न्युज
शहर प्रतिनिधी, चंद्रपूर
” ऐकावे ते नवलच” या उक्तीप्रमाणे चंद्रपूर शहरातील अंबलवार या कुटुंबातील तीन व्यक्तीचा आज दिनाक २५ मे ला एकाच दिवशी वाढदिवस आहे. अंबलवार कुटुंबातील मोठी सून रोहिणी रविकिरण अंबलवार ह्यांची जन्मतारीख २५/०५/१९९३ आहे. रोहिणीचा मुलगा अद्वैत रविकिरण अंबलवार याची जन्मतारीख २५/०५/२०१९ आहे रोहिणीचा दिर संतोष रमेश अंबलवार यांची जन्मतारीख २५/०५/१९९१ आहे त्यातल्यात्यात आणखी विशेष रोहिणी व रविकिरण यांचा लग्नसुद्धा २५/०५/२०१७ ला झाला म्हणजे यांच्या लग्नाचा वाढदिवसपण २५ मे आहे .आज २५ मे ही तारीख अंबलवार परीवाराकरिता खूपच लक्की आहे. गेल्यावर्षी २५ मे ला वाढदिवस मोठ्या थाटामाटाने साजरा करण्यात आला. यावर्षी मात्र लॉकडाऊन असल्यामुळे घरच्याघरीच साधेपणाने साजरा करण्यात आला. एकाच कुटुंबातील तीन व्यक्तीचा वाढदिवस असल्यामुळे वाढदिवसाच्या सुभेच्छा देतांना नातेवाईक व मित्रमंडळी “त्रिवेणी संगमाला वाढदिवसाच्या सुभेच्छा” अश्या सुभेच्छा देत आहेत.




