“तु शेर ……….मैं सव्वाशेर” कोविड केंद्रावरून वणीतील राजकारण तापले
★ ” ये पब्लिक है ये सब जाणती है…. वणीत चर्चा
★वणीत कोरोना रुग्णांचे हाल……राजकारण बेेेहाल
वणी (20 एप्रिल ) :- कोरोनाचा उद्रेक होत असताना वणी शहरात कोविड रुग्णालय सुरू करण्यासाठी एकाने धडपड केली, तेव्हाच दुसरा वेगळ्या पद्धतीने कार्य करतो तर तिसरा त्याही पेक्षा काही कमी नाही हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.
सविस्तर वृत्त असे की, वणीचे नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे यांनी शहराची परिस्थिती पाहता जिल्हाधिकारी यांना वणी नगर परिषद कल्याण मंडपम येथे कोविड केअर केंद्र सुरू करण्याची परवानगी मागितली व परवानगी मिळाली. त्यामुळे जनतेच्या मनात नाव झालं मग प्रसिद्धी तर होणारच आहे.
विद्यमान आमदार यांनी या काळात काही केले नाही म्हणून त्यांनी बैठक घेऊन आमदार निधीतून तात्काळ एक कोटी रुपये जिल्हाधिकारी यांना दिले.
त्यामुळे सर्व कोविड रुग्णांना उपचार चांगला मिळेल त्यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे कौतुक सुरू झाले. आता जनतेवर अन्याय होत असेल तर ते सहन करू शकत नाही, त्यातही मराठी माणूस शांत कसा राहील ? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपाध्यक्ष राजू उंबरकर यांनी मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री तसेच विविध ठिकाणी पत्र पाठवून
कोरोना बाबत जागृती दाखवली व वणी शहरात ग्रामीण रुग्णालयात ट्रामा केयर मध्ये कोविड केंद्र रुग्णांना सेवा पुरवण्यासाठी चिता आंदोलन करणार असल्याचे धमकी प्रशासनाला दिली प्रशासनाने लगेच पत्राची दखल घेत आंदोलन करू नका आम्ही सर्व व्यवस्था करतो म्हणून लगेच पत्र दिले आंदोलन मागे घ्या.
या कोरोनाचा काळात या सर्व बाबीत जनतेला काय मिळालं. सहा महिन्यापूर्वी मनसेचे उपोषण झाले कोविड केंद्र सुरू झाले पण अध्यावत सोई सुविधा नाही,आठ दिवसात सुरू होणाऱ्या उपजिल्हा रुग्णालयाच भिजत घोंगड तसच पडले आहे.
वणी तालुक्यातील आरोग्य सेवा पूर्णतः कोलमडली आहे.कोरोना रुग्णांचे आज हाल होत आहे, .” ये पब्लिक है सब जाणती है ” मात्र कोरोना वरून राजकीय कलगीतुरा पुन्हां किती दूर जाणार अशी चर्चा.



