Vidarbh24News

Latest Online Breaking News

वणी विधानसभा क्षेत्रातील कोविड केंद्रासाठी आमदार  निधीतून एक कोटी रुपये

वणी(19 एप्रिल) :- सद्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असुन वणी विधानसभा क्षेत्रात कोरोना बाधित रुग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. त्यामुळे रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांत आक्सीजन, व्हेंटिलेटर, बेड, इंजेक्शन अशा विविध बाबीची व्यवस्था कमी पडत असल्यामुळे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवारयांनी वणी येथील ग्रामीण रुग्णालयासाठी 50 लाख, झरी तालुक्यासाठी 25 लाख व मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना रुग्णांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी 25 लाख असे एकूण एक कोटी रुपयांचा आमदार निधी उपलब्ध करून दिली आहे.

या संबंधीचे पत्र त्यांनी लगेच जिल्हाधिकारी यांना दिले आहे.  कोरोना रुग्णासाठी सुसज्ज सुविधा पुर्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर मध्ये व्हेंटिलेटर, ऑक्सिजन, बेड, रेमडेसीवर इंजेक्शन, स्ट्रेचर या आवश्यक बाबीवणी मारेगाव, झरी तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपलब्ध व्हावे यासाठी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी तातडीनेएक कोटी रुपये उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे वणीकरांच्या सेवेत यावेळी सुसज्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेले बेड,

ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी, ऐबुलंन्स व आवश्यक डॉक्टर वनर्सेस इत्यादी व्यवस्था आमदार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!