वणी करांसाठी आता लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार सुसज्ज डेडिकेटेड कोविड सेन्टर
★ आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांच्या प्रयत्नाला यश
वणी (19 एप्रिल ) :- सद्या कोरोनाने सर्वत्र हाहाकार माजवला असुन वणी शहरासह ग्रामीण भागात सुद्धा दिवसेंदिवस कोविड-१९ रूग्णांची संख्या वेगाने वाढत चालली आहे. परिणामी रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांत आक्सीजन चि व्यवस्था कमी पडत असुन आता कोविड रुग्णांसाठी बेड कमी पडु लागल्या आहेत. हि समस्या लक्षात घेता,
वणी विधान सभेचे लोकप्रिय आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी तातडीचे प्रयत्न केले असता त्यांच्या प्रयत्नातून कोरोना रुग्णांसाठी आता सुसज्ज सुविधा पुर्ण डेडिकेटेड कोविड हेल्थ सेन्टर वणीकरांच्या सेवेत लवकरच उपलब्ध होणार आहे.
याबाबतची माहिती आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी रविवार दि.१८ एप्रिल रोजी दुपारी येथिल विश्रामगृह बोलवण्यात आलेल्या सर्व संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत दिली.
बैठकीत ग्रामिण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. धर्मेन्द्र सुलभेवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विकास कांबळे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी सुसज्य रुग्णालयासाठी आवश्यक असलेले बेड, ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, औषधी, अम्बुलंस व आवश्यक डॉक्टर व नर्सेस इत्यादी व्यवस्था करण्याच्या दृष्टीकोनातून आमदार निधी उपलब्ध करून देणार असल्याचे आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार यांनी सांगितले.
तसेच सद्या ग्रामिण रुग्णालयातील ज्या ठिकाणी ट्रामा केअर चालू आहेत ते कोविड केअर सेन्टर परसोडा येथील शासकीय निवासी शाळा येथे सुरू करण्याचे निर्देशही यावेळी आमदार बोदकुरवार यांनी केले.
तसेच शहरातील आंबेडकर चौक येथे असलेल्या नगर परिषदेचे कल्याण मंडपम मध्ये विलगिकरण कक्ष स्थापन करण्याकरिता सुध्दा यावेळी चर्चा करण्यात आली.
यावेळी आमदार संजिवरेड्डी बोदकुरवार, नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे,पं.स.सभापती संजय पिंपळशेंडे, दिनकर पावडे, गजानन विधाते तालुकाध्यक्ष, कैलास पिंपराडे,दिपक मत्ते , नितीन वासेकर,दिपक पाऊणकर व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.



