*मादगी व मातंग समाजातील वाजंत्री व बॅंड वाजवणा -या कुटूंबाला आर्थिक सहाय्य द्या.*
*मादगी व मातंग समाजातील वाजंत्री व बॅंड वाजवणा -या कुटूंबाला आर्थिक सहाय्य द्या.*
*पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास ईटकलवार यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी.*
सध्या महाराष्ट्रात (कोविड 19) मुळे सर्वत्र लाकडाऊन सुरू आहे. या लाकडाऊनच्या काळात मादगी व मातंग समाजातील बॅंड वाजवणा-या कुटूंबाची परिस्थिती अत्यंत भिषण व हलाखीची झालेली आहे, मागील वर्षापासून ऐन लग्णसराईमध्ये लाकडाऊन होत असल्यामुळे मादगी व मातंग समाजाचा मुख्य व्यवसाय पूर्णपणे बंद झालेला आहे.या समाजाचा उदरनिर्वाह या व्यवसायावरच अवलंबून असल्यामुळे मादगी व मातंग समाजाच्या घरी उपासमारीची वेळ आली असून चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातील वाजंत्री व बॅंड वाजवणा-या कुटूंबाला आर्थिक सहाय्य देण्यात यावे अशी मागणी , पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते चंद्रहास ईटकलवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याकडे ई-मेल द्वारे केली आहे.
मादगी व मातंग समाजाला पुढील काळात काम मिळणे कठीण झाले असून सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून माझ्द्र्गी व मातंग समाजातील वाजंत्री व बॅंड वाजवणा-या कुटूंबाला प्रती कुटूंब 5000/- रू.ऊपलब्ध करून देण्याची मागणी चंद्रहास ईटकलवार यांनी केली आहे.



