Vidarbh24News

Latest Online Breaking News

लॉकडाऊनच्या फायदा घेत तंबाखाची विक्री करणाऱ्या किराणा दुकानदारास अटक,४ लाख ३९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त

★कारसह आरोपी राजेश पांडुरंग मारगमवार (४४) अटक

वणी( 15 एप्रिल) :– वणी येथील भाग्यशाली नगर येथील एका किराणा दुकानातून प्रतिबंधित सुगंधीत तंबाखू वाहनात भरून विक्रीकरिता नेला जात असल्याच्या विश्वसनीय माहिती वरून डीबी पथकाने त्याठिकाणी धाड टाकली असता एका कार मध्ये जर्दा/मजा हा सुगंधित तंबाखू आढळून आला. हा तंबाखू विकण्यावर बंदी असतांनाही लॉकडाऊन काळात चोरून लपून या तंबाखूची विक्री करण्यात येत असल्याचा प्रकार या धाडीतून उघड झाला आहे.

हा सुगंधित तंबाखू इतरत्र विक्री करिता जाणार तोच पोलिसांनी धाड टाकून सुगंधित तंबाखाची वाहतूक करणाऱ्या कारसह दुकानदारास ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हे दाखल केले. या धाडीत पोलिसांनी एकूण ४ लाख ३९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

शहरात लॉकडाऊन लागताच पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून गुन्हेगारी वर्तुळावर वचक निर्माण करण्याच्या दिशेने पावले उचलली जात आहे. व्यसन भागविणाऱ्या वस्तूंची चोरट्या मार्गाने होणारी विक्री थांबविण्याचे पोलिसांसमोर आव्हान असून पोलिसांनी बंदी असतांनाही या वस्तूंचा अवैधरित्या व्यापार करणाऱ्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.

व्यसनी वस्तूंच्या विक्रीतून मोठा आर्थिक फायदा होत असल्याने अवैध विक्रेते व्यसनी वस्तूंच्या विक्रीकरिता कोणतीही जोखीम पत्कारायला तयार होतात. अवैध धंद्यांच्या माध्यमातून झटपट पैसा कमावता येत असल्याने व्यसनी वस्तूंच्या धंद्यांमध्ये अनेक जण सरसावले आहेत. शहरातील भाग्यशाली नगर येथील किराणा दुकानातून अवधरीत्या सुगंधित तंबाखू कारमध्ये भरून विक्रीकरिता नेत असलेल्या अशाच एका दुकानदाराला पोलिसांनी अटक केली आहे. हा किराणा दुकानदार आपल्या सँट्रो कार क्रं MH २९ AL २६३ मध्ये जर्दा/ मजा भरून इतरत्र डिलिव्हरी देण्याकरिता जाणार तोच पोलिसांनी त्याठिकाणी धाड टाकून अवैधरित्या प्रतिबंधित तंबाखाची वाहतूक करणाऱ्या कारसह आरोपी राजेश पांडुरंग मारगमवार (४४) रा. भाग्यशाली नगर यास ताब्यात घेऊन त्याच्यावर भादंवि च्या कलम १८८, २६९, २७०, २७१, २७२, २७३ व साथ प्रतिबंधक कलम २, ३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

या धाडीत पोलिसांनी मजा १०८ या सुगंधित तंबाखाचे २०० ग्राम वजन असलेले १०० नग डब्बे किंमत ७५५०० रुपये , ४०० ग्राम वजनाचे ९० पॉकिट किंमत ४८६०० रुपये, बाबू गोल्ड सुगंधित तंबाखाचे ५०० ग्राम वजनाचे ६२ पॉकिट किंमत २१६०० रुपये, ईगल हुक्का या सुगंधित तंबाखाचे २०० ग्राम वजनाचे ६८ पॉकिट किंमत १८३६० रुपये, चारमिनार गोल्ड सुपारीचे ५०० ग्राम वजनाचे १०० पॉकिट किंमत २५००० रुपये व सुगंधित तंबाखाच्या वाहतुकी करिता वापरण्यात आलेली कार किंमत २ लाख ५० हजार रुपये असा एकूण ४ लाख ३९ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.  

सदर कार्यवाही उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार वैभव जाधव, सपोनि माया चाटसे, डीबी पथकाचे डोमाजी भादेकर, सुदर्शन वानोळे, सुधीर पांडे, सुनील खंडागळे, रत्नपाल मोहाडे, पंकज उंबरकर, दिपक वान्द्रस्वार यांनी केली

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

December 2025
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!