महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे कायर गावातील नागरिक हैरान
★महावितरण प्रशासनाने व गावातील ग्रामपंचायतने सुद्धा बाबीकड़े पाठपुरावा करुन नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देण्याची गरज…
★उन्हाळ्याचे दिवसात भर दुपारी गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित…
वणी( 15.एप्रिल ):- तालुक्यातील कायर गावातील नागरिकांच्या सतत चालू असलेल्या विजेच्या लपंडावामुळे उन्हाळ्याच्या उकिरड्याने कायर गाववासी हैरान झाले आहे.तहसील मध्ये कुठेही लोडशेडिंग नसून मात्र का या गावात जणू काही लोडशेडिंग सुरू की काय ?असा प्रश्न निर्माण होत आहे. या महावितरणाचा भोंगळ कारभारामुळे तूर्तास गावकरी खूप वैतागले आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने नागरिकांना अतिरिक्त त्रास सहन करावा लागत आहे. गावातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने वृद्धासह लहान बालकांना देखील फार मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
या परिसराच्या आजूबाजूच्या गावांमध्ये वीज पुरवठा सुरळीत असून तर मग कायर गावातच लाईनमन झोपी गेले की काय? हा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकांची गैरसोय होत आहे हा म्हणजे भोंगळ कारभाराचा की नाही ? नागरिकांची आर्त हाक स्पष्ट दिसून येत आहे.लॉकडाउन झाल्याने पाण्याचा वापर हा घरोघरी जास्त प्रमाणात होत आहे.
त्यासाठी विद्युतची गरज भासते. तसेच प्रशासनाने घरीच रहा ! असे आदेश दिल्यास असल्याने आता एवढ्या कडक उन्हाळ्यात वीजपुरवठा शिवाय घरी राहायचे तरी कसे ? हा प्रश्न कायर वासियांना सतावू लागला आहे.
सकाळी, दुपारी तर कधी मध्यरात्री सुद्धा लाईन चालू बंद होत आहे.तातडीने महावितरण प्रशासनाने व गावातील ग्रामपंचायतने सुद्धा बाबीकड़े पाठपुरावा करुन नागरिकांच्या समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे
व विद्युत पुरवठा सुरळीत करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी अशी जनतेतून तीव्र शब्दात बोलले जात आहे.
झोपी गेलेले लाइनमेनला व संबंधित प्रशासनाला जागे करण्याचे काम सुद्धा कायरवासी करणार की काय? हे बघणे आता महत्त्वाचे आहे.



