अब्दुल हमीद चौक समिती तर्फे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी

राजूर (15.एप्रिल):– भारतीय संविधान निर्माते डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती राजूर येथील अब्दुल हमीद चौक समिती च्या होतकरू तरुणांतर्फे अभिवादन व आल्पोहार वाटप करून कार्यक्रम संपन्न झाला.राजूर नगरीतील अब्दुल हमीद चौक येथे तरुणांनी काही महिन्या अगोदर स्वयंप्रेरणेने शहीद अब्दुल हमीद चौक चे पुनर्जीवन, सौंदर्यीकरण केले होते.आता त्याच चौकात आकर्षक रोषणाई करून परिसरातील लोकांना एकत्रित करून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 130 वी जयंती अगदी साध्या स्वरूपात साजरी केली.
यावेळी राजूर ग्राम पंचायत सदस्या चेतना पाटील,महेंद्र श्रीवास्तव,यशवंत पाटील,महेश लिपटे , या मान्यवर पाहुण्यांनी जयंती नमित्ताने विचार व्यक्त केले.
“प्रत्येक मानवाला मानव म्हणून जगण्याचा अधिकार देणारे महान अर्थतज्ञ, प्रख्यात कायदेपंडित, अभ्यासाची आवड असणारे आजन्म विद्यार्थी,भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशातील प्रत्येक घराघरात साजरी झाली पाहिजे.”– चेतना पाटील
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अब्दुल हमीद चौक समितीचे नुर शेख,देवानंद गजभिये,अक्षय खोब्रागडे, ताहिर शेख, अजीम शेख,मंगल टिपले आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.