संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच तर्फे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संपन्न
वणी (14 एप्रिल) :- शहरातील संत रविदास महाराज सभागृह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त संत रविदास महाराज चर्मकार युवा मंच,वणी व राष्ट्रीय चर्मकार महासंघ वणी विभाग तर्फे अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी राष्ट्रीय चर्मकार महासंघ,यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष महेश लिपटे व संत रविदास युवा मंच वणी चे
संघटक किसन कोरडे यांनी जयंतीनिमित्त अभिवादन पर विचार व्यक्त केले.
“भारतातील सर्व वर्ग,धर्म,जाती,लिंग यातील प्रत्येकाला संविधान निर्मितीतून समानतेचा अधिकार देणारे डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या कर्तृत्वाची सीमा अमाप आहे. “– महेश लिपटे

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनी कुरील यांनी केले.
सदर कार्यक्रमास राष्ट्रीय चर्मकार महासंघ यवतमाळ जिल्हा युवा उपाध्यक्ष अमोल बांगडे,भालर शाखा सचिव पंकज वादेकर,श्याम गिरडकर आदी समाज बांधव उपस्थित होते.



