व्यापारी संघटना सावलीच्या वतीने तहसीलदारामार्फत मुख्यमंत्रांना निवेदन

आज व्यापारी संघटना सावलीच्या वतीने तहसीलदारा मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदन देण्यात आले.
जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्या आदेशानुसार सावली शहरातील सर्व व्यापारी प्रतीष्टाने (अत्यावश्यक दुकाने वगळता) बंद ठेवावयाचे आहे. परंतु गेल्यावर्षीच्या लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे कंबरडे मोडले आहे आत्ता पुन्हा लॉकडाऊन म्हणजे व्यापाऱ्यांचे जीवनच उध्वस्त होणार आहे. सरकार या वेळेस कोणत्याच गोष्टीची मदत करणार नाही आहे. लाईट बिल, दुकान भाडे, कर्जाची किस्त माफ होणार नाहीं. व्यापाऱ्यांनी आपला घर कसा चालवायचा हा मोठा प्रश्न आहे. व्यापाऱ्यांचा पोटापाण्याचा विचार करून आम्हाला आम्हची प्रतीष्टाने उघडण्याची मुभा द्यावी आणि आपल्यामार्फत माननीय मुख्यमंत्री यांना कळवावे. आम्ही आमच्या दुकानात कोरोना नियमावलीचे पूर्ण पालन करू याची आम्ही हमी देतो. अशा स्वरूपाचे निवेदन व्यापारी संघटना सावली तर्फे देण्यात आले.
यावेळी प्रकाश खजांची, प्रदीप ताटकोंडावार, जुगलकिशोर सारडा, किशोर निकुरे, राकेश ताटकोंडावार,अजय ताटकोंडावार, पंकज सुरमवार,विपिन सुरमवार,राजू संतोषवार, रवी संगमवार,,पंकज चिटमलवार,प्रदीप येनुरवार, प्रशिक वनकर ,रुपचंद लाटेलवार,अजय मंडलवार,बालाजी कन्नावार, पिंटू गड्डमवार इत्यादी व्यापारी उपस्थित होते.