Vidarbh24News

Latest Online Breaking News

भाजपा व्यापारी आघाडीने महाराष्ट्र मुख्यमंत्री यांनी दिलेला आदेश मागे घेण्यासाठी निवेदनातून केली मागणी

★वणी तहसीलदारांमार्फ़त दिले निवदेन….

★जनमानसात कमालीची अस्वस्थता ….

वणी( 7 एप्रिल ) :- वणी भाजपा व्यापारी आघाडीने आज रवि बेलूरकर भाजपा जिल्हा महामंत्री यांचा नेतृत्वतात शहरातील तहसीलदरांमार्फ़त देण्यात आलेल्या निवदेनातून महाराष्ट्र मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी दिलेला 30 एप्रिल पर्यंत सर्वच दुकाने मॉल व बाजारपेठ बंदचे आदेश मागे घेण्यासाठी व्यापारी आघाडीने जोरदार मागणी केली आहे.

मागील 1 वर्षभरापासून कोरोना संकटाने मानवी जीवन धोक्यात सापडले असुन या संकटा सोबतच सुलतानी संकटाने नागरिक त्रस्त आहेत .कोरोनाचा उद्रेक वाढत आहे .त्यासाठी प्रशासनाने लॉकडाऊन सदृश्य निर्बंध लावल्यामुळे सर्वसामान्य जनता होरपळून निघत आहे व गरीब जनता ही बेहाल स्थितीत आहे. त्यामुळे जाहीर केलेल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधाचा फेर विचार करून  आदेश मागे घ्यावा ही मागणी वणी व्यापारी आघाडी भाजपा याने केला आहे.

  मजूर , कामगार , व्यापारी , लघु उद्योजक , गॅरेज मालक , सलून , हॉटेलव्यावसायिक तसेच या व इतर छोट्या मोठ्या व्यवसायांवर अवलंबून असणाऱ्यांचा विचार महाराष्ट्र शासनाने करावा व आदेश मागे घ्यावे अशी मागणी निवदेनातून केली आहे .

आज दि 7/ 4/2021 रोजी  शहरातील व्यापाऱ्यांचे शिष्टमंडळाने निवदेनातून आदेश मागे घेण्याची मागणी यांनी मुख्यमंत्री यांना पत्र लिहून यासंदर्भात निर्बंधाचा सर्व समावेशक आदेश मागे घ्यावी ही मागणी केली आहे .

कोरोना काळात लावण्यात आलेल्या कठोर निर्बंध उठविणे कोरोनाचा उद्रेक वाढत असून प्रशासनाने लावलेल्या लॉकडाऊन सदृश्य निर्बंधामुळे जिल्हाभरात आक्रोश सुरू झाला आहे .अगोदरच कोरोनाचा मार आणि भरीस भर प्रशासनाचा भार अशी परिस्थिती नागरिकांवर उद्भवलेली आहे.

लॉक डाऊन जरी केले नसले तरी लावलेले निर्बंध हे लॉकडाऊनचीच आठवण करून देणारे आहे. शनिवार रविवार या दोन दिवसांचा लॉकडाऊनचा असल्यास नागरिक सहन करू शकतात.परंतु 30 एप्रिल पर्यंत शासनाने कड़क निर्बन्द लाऊन मॉल व बाजरपेठाबंद आदेश देण्यात आले .त्यामुळे जनमानसात कमालीची अस्वस्थता आहे. काही ठिकाणी लोक रस्त्यावर उतरून त्याचा विरोध करताहेत.

प्रशासनाने निर्बंध घालताना विविध क्षेत्रांचा विचार केलेला नाही .या निर्बंधाचा अनेक क्षेत्रांना मोठा फटका बसत असून, अर्थव्यवस्थाही यामुळे खिळखिळी होणार आहे. त्यामुळे रिटेलर्स, छोटे दुकानदार, छोटे हॉटेल्स, केश कर्तनालय अशा सर्व घटकांतील व्यावसायिक बेरोजगार होणार आहे.

तसेच ट्रान्सपोर्टेशन जरी खुली ठेवली असली तरी गॅरेज आणि स्पेअर पार्टस दुकाने मात्र बंद ठेवण्यात आल्याने वाहने नादुरुस्त झाल्यास स्पेअर पार्ट न मिळाल्याने व दुरुस्ती न झाल्याने ट्रान्सपोर्ट सुद्धा बंद राहणार आहे . कोरोना प्रतिबंध करण्यासोबतच अर्थ कारण बंद होणार नाही , तसेच हातावरच्या पोटावर असणारे मजूर , दुका कामगार , बांधकाम क्षेत्रातील बांधकाम साहित्य पुरविणारे दुकाने बंद झाल्याने बांधकाम मजूर यांची उपासमार होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे आहे.

त्यामुळे लावण्यात आलेले निर्बंध आदेश मागे घ्यावा, ही मागणी वणी भाजपा आघाड़ीने निवेदनातून केली आहे.

 

निवदेन देत असतांना जिल्हा सरचिटणीस रविभाऊ बेलूरकर व शहराध्यक्ष श्रीकांत पोटदुखे ,भाजपा व्यापारी आघाडीचे अध्यक्ष लवलेश लाल, भाजपा व्यापारी आघाडीचे उपाध्यक्ष रवि रेभे ,भाजपा व्यापारीचे सरचिटणीस संदीप मदान व सुधीर साडी हजर होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!