Vidarbh24News

Latest Online Breaking News

वाघाच्या हल्ल्यात पवनपार येथील दोन व्यक्ती ठार

सिंदेवाही वनपरिक्षेत्रा अतर्गत येत असलेल्या पवनपार येथे वाघाने एका मागुन एक इसमावर हल्ला करून   एकाच परीवारातील दोन व्यक्तींना  ठार केल्याची घटना  सकाळी सात वाजताच्या सुमारास घडली.

कमलाकर रूषी उंदीरवाडे  , दूरवास धानू   उंदीरवाडे या हमला करून ठार केलेल्या इसमाचे नाव आहे.

सदर घटना पवनपार ते खैरी या मार्गावर परंतू पवनपार गावाजवळ घडली.

सद्या मोहफुल गोळा करण्याचे काम पवनपार परीसरात जोमाने सुरू आहेत . गावात काम नाही त्यामुळे मोहफुल गोळा करून कित्येक कुटूंब आपली उपजिविका चालवितात .

आज सकाळीच पवनपार येथिल नागरीक मोहफुल गोळा करायला गेले होते.

जिथे घटना घडली हे ठिकान गावापासुन अगदी जवळ घडली.

सदर व्यक्ती गावालगतच मोहफुल गोळा करीत होते.

दबा धरून बसलेल्या वाघाने दोघावरही एकामागुन एक हल्ला केला.  ते जागीच गतप्राण झाले.

दोन्ही शवांना उत्तरीय तपासनी करीता पाठवण्यात आले.

घटना पाहण्याकरिता पवनपार, गुंजेवाही, पवना, खैरी, टेकरी, सामदा  या गावातील लोक आले असल्याने घटनास्थळी जत्रेचे रूप आले होते.

सदर घटनेने पवनपार व परीसरात गावात  भितीची दहशत पसरली आहे.

वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परीसरातील नागरीकांनी केली आहे.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!