राजूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड-19 लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद
वणी (3 एप्रिल ):– कोरोना रोगापासून बचावासाठी सरकार तर्फे निःशुल्क लसीकरण देशातील प्रत्येक शासकीय आरोग्य केंद्रात उपलब्ध झाली आहे,राजूर येथेही प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरणाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद मिळत आहे .राजूर येथे 22 मार्च 2021 पासून सुरुवात होताच, राजूर प्राथमिक आरोग्य केंद्राला संलग्नित असलेले गावातील 45 वर्षे वरील जनता स्वयंस्फुर्तीने लसीकरण करून घेत आहेत.

सुरुवातीला आठवड्यात सोमवार,बुधवार,शुक्रवार या 3 दिवसातच लसीकरण सुरू होते,नंतर लोकांचा कल पाहून सोमवार ते रविवार असे आठवड्याच्या 7 ही दिवस लसीकरण सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत वाढविण्यात आले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्र,राजूर चे डॉ.चिखलीकर यांनी 45 वर्षेवरील जनतेनी लसीकरण करून घेण्याचे आव्हान केले आहे
.
लसीकरण मोहिमेला यशस्वीतेसाठी राबविण्यासाठी घाडगे ,गजभे,बलकी , रेड्डीवार ,
अंकलवार ,रुईकर , साखरे , मांडवकर , खामनकर , हस्ते , कुचनकर , महेश मोडक, सुनील तांबेकर सर्व कर्मचारी व आशा सेविका अथक परिश्रम घेत आहेत.



