वणी शहरात दुसरे लसीकरण केंद्र सुरू करा -आ. संजीवरेड्डी बोदकुरवार यांची मागणी

वणी(2.एप्रिल ):- वयाच्या 45 वर्षावरील सर्व व्यक्तींचे लसीकरण दि.1 एप्रिल पासून सुरू होत आहे. वणी सारख्या मोठ्या शहरात ग्रामीण रुग्णालयात केवळ एकच लसीकरण केंद्र आहे. सीमित जागा, उपलब्ध कर्मचारी वर्ग यातून रोज 300 लसीकरणाचे उद्दिष्ट पूर्ण होईल असे वाटत नसल्यामुळे ट्रामा केअर सेंटर किंवा इतर सोईच्या ठिकाणी पुरेसे कर्मचारी व जागेसह दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी मागणी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे. सपूर्ण देशात ज्या प्रमाणे लसीकरणाची सुरुवात झाली. त्याप्रमाणे वणी तालुक्यात सुद्धा दि. 16 जानेवारी पासून आरोग्य कर्मचाऱ्यासाठी लसीकरण सुरू झाले होते. दुसरा टप्पा फ्रंट लाइन वर्कर साठी 22 जानेवारी पासून तर दि. 1 मार्च पासून 60 वर्षावरील व ज्यांना बी.पी. शुगर अशा रोगाची लक्षणे आहेत अशा 45 वर्षावरील व्यक्तिंना लस देण्याची मोहीम सुरू झाली होती.
चौथा टप्पा 45 वर्षावरील सर्व व्यक्तीसाठी दि. 1 एप्रिल पासून सुरू होत आहे. आत्तापर्यंत वणी येथील केंद्रात 5792 व्यक्तींचे पहिल्या टप्प्याचे लसीकरण पूर्ण झाले आहे.
दि. 30 मार्च पर्यंत वणी येथे कोव्हीशिल्ड या लसीचे लसीकरण करण्यात आले होते. दि. 31 मार्चपासून कोव्हाक्सिन च्या नवीन 500 डोजेस प्राप्त झाल्यामुळे पहिल्या दिवशी दि. 31 मार्चला 59 व्यक्तींना व दि. 1 एप्रिलला 147 व्यक्तींना लस देण्यात आली आहे. ज्या व्यक्तींनी लसीचा पहिला डोज किव्हीशिल्ड या लसीचा घेतला असेल त्यांना आता त्याच लसीचा दुसरा डोज घ्यावा लागणार आहे. ज्यांना आता दुसरा डोज घ्यायचा असेल त्यांचे लसीकरण कोव्हीशिल्ड ही लस उपलब्ध झाल्याशिवाय होणार नाही.
आता पर्यंत 5 हजारापेक्षा जास्त व्यक्तीना दुसरा डोज देणे. त्यासोबत 45 वर्षावरील प्रत्येक व्यक्ती पहिला डोज घेण्यासाठी येथील ग्रामीण रुग्णालयात आल्यानंतर येथे साध उभं राहायलाही जागा नाही अशी स्थिती आहे.
त्यासोबत 1 एप्रिल पासून लसीकरणाचे वाढवून दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेला कर्मचारी वर्ग सुद्धा येथे उपलब्ध नाही. त्यामुळे कर्मचारी वर्गासह नवीन जागेत दुसरे लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे अशी अशी मागणी वणी विधानसभेचे आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी केली आहे.