आकापूर (तळोधी) येतील महिलेला “माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेकडून” मिळाली रक्तदानाची मदत..

- आकापूर (तळोधी) येतील महिलेला “माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेकडून” मिळाली रक्तदानाची मदत..
चंद्रपूर:-(२एप्रिल) आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु. एन. न्यूज २४ संलग्न., “माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचे” सिंदेवाही उपाध्यक्ष श्री. माननीय कृष्णा आर. आनंदे यांच्या व्हाट्सअप(WhatsApp) वर अचानक ०१/०३/२०२१ रोजी सकाळी ९ वाजताच्या दरम्यान ( ए ) पॉझिटिव्ह रक्त त्वरित पाहिजे असा SMS आला, त्यानंतर त्यांनी विचारपूस करून सविस्तर माहिती जाणून घेतली. तेव्हा असे लक्षात आले की नागभीड तालुक्यातील तळोधी (बा.) जवळील आकापुर येथील एका भूमी अविनाश भाकरे वय (२१) या महिलेची प्रसूती (बाळतपण) झाला असून तिला रक्त ( ए ) पॉझिटिव गटाची अत्यंत आवश्यकता आहे. त्यामुळे माननीय “माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना” चे सिंदेवाही तालुका उपाध्यक्ष कृष्णा आर. आनंदे यांनी या घटनेची तात्काळ दखल घेत ही माहिती सरळ आंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना., “माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेला” दिली. त्यानंतर माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना संघटणेने तात्काळ या घटनेची नोंद घेतली; त्यात सेनेचे माननीय चंद्रपूर जिल्हा सचिव सचिन आवारी सर मा. अ. पो. मी. व प. सं. सेना यांचा रक्तगट ( ए ) पॉझिटिव असल्याचे सांगितले व रक्तदान करण्यासाठी होकार देऊन त्यांनी तात्काळ चंद्रपूर प्रशासकीय रुग्णालयात धाव घेतली व पेशंट भूमी अविनाश भाकरे या महिलेला रक्तदान केले. त्यांनी अत्यंत आवश्यक तेच्या वेळी रक्तदान करून भूमी अविनाश भाकरे या महिलेला जीवनदान दिले. त्याबद्दल भाकरे कुटुंबियांनी मा. सचिन आवारी सरांचे आणि “माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना” महाराष्ट्र राज्य यांचे आभार मानले. अंतरराष्ट्रीय मानवाधिकार राजदूत संघटना, ग्लोबल पीस कौन्सिल भारतीय महाक्रांती सेना व यु. ए. न्यूज २४ संलग्न “माहिती अधिकार, पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना” नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असून गरजू व्यक्तींना मदत करीत असते. रक्तदान हेच महादान, हीच मानव सेवा असून प्रत्येकाने आयुष्यात संकटाच्या वेळी गरजू व्यक्तीला रक्त देऊन मदत करावी हीच अपेक्षा असे सेनेचे जिल्हा सचिव रक्तदाता मा. सचिन आवारी सर यांनी म्हटले.