जिल्हा परिषद शाळा ‘कवठी’ येथे ‘नेहरू युवा केंद्र चंद्रपूर’ यांच्या वतीने “शहीद दिन” साजरा..

जिल्हा परिषद शाळा ‘कवठी’ येथे ‘नेहरू युवा केंद्र चंद्रपूर’ यांच्या वतीने शहीद दिन साजरा..
दिनांक २३मार्च ला covid-19 च्या नियमांचे पूर्णपणे पालन करून “जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा कवठी” येथे ‘नेहरू युवा केंद्र चंद्रपूर’ यांच्या वतीने “शहीद दिन” कार्यक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ग्रामपंचायत कवठी च्या सरपंच सौ. कांताबाई पि. बोरकुटे आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य उपस्थित होते. प्रमुख पाहुणे मनून श्री. टिकारामजी म्हशाखेत्री तंटामुक्ती समिती अध्यक्ष तसेच शाळेचे मुख्याध्यापक श्री. पवार सर, नैताम सर, मांडाळे सर, सातेवार सर, कुळमेथे सर, वाकळे सर होते. या कार्यक्रमाचे मार्गदर्शक दळांजे सर होते. युवकांना व शाळेच्या विद्यार्थ्यांना “शहीद दिन” याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. भगत शिंह, राजगुरू, सुखदेव यांना फाशी देण्यात आली. त्यावेळी “इंन्कलाब जिंदाबाद”हा नारा देण्यात आला याषयी सविस्तर अशी माहिती दळांजे सर यांनी दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नेहरू युवा केंद्र चंद्रपूर चे सावली तालुका समन्वयक श्री. मंगेश राजूरकर यांनी केले. तर आभार युवा मंडळाचे सदस्य किशोर बोरकुटे यांनी मानले. अश्या प्रकारे शहीद दिन हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.