कवठी परिसरात वन्यप्राण्यांचे हैदोस…
कवठी परिसरात वन्यप्राण्यांचे हैदोस…
कवठी परिसरातील वन्यप्राण्यांचे बंदोबस्त करण्यात यावे ग्रा. प. सदस्य राकेश घोटेकार यांची मागणी.
सावली तालुका प्रतिनिधी :- (२८ मार्च)
कोरोना संकटात अडकलेले शेतकरी आपल्या कुंटूबांची पालनपोषण करण्याकरिता इथून तिथून पैसा जमा करून मक्का पिकांची लागवड केली, परंतु वन्य प्राण्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे इकडे आड तिकडे विहीर या मनिप्रमाणे शेतकऱ्याची अवस्था झालेली दिसून येत आहे.सावली तालुक्या लगतच असलेल्या कवठी गावातील परिसरात मागील काही दिवसापासून जंगली प्राण्याचा हैदोस वाढलेला आहे. कवठी परिसरातील शेतकरी मक्का पिकांची लागवड केलेले आहे आणि आता ऐन हंगामाच्या वेळेस रानडुक्कर मोठया प्रमाणात शेतकऱ्याची नुकसान करीत आहे. त्यामुळे आमचं मक्का पिकाला लावलेलं खर्च निघनार की काय? परिसरातील शेतकरांच्या जमिनी गावाला लागूनच आहे आणि आम्ही रात्री जागली जातो त्यावेळेस वन्य प्राणी नसतात परंतु आम्ही झोपी गेलो की नासाडी करतात असा प्रश्न शेतकऱ्यांना वारंवार पडत असल्यामुळे शेतकरी चिंताजनक झालेले दिसून येत आहेत. आणि ही बाब शेतकऱ्यांनी नवनियुक्त ग्रा. प सदस्य कु. राकेश घोटेकार यांना माहिती दिली असता त्यांनी तात्काळ कमेटीची बैठक बोलावून त्या बैठकी मध्ये ठराव घेण्यात आला. त्यावेळी ग्रा.अधिकारी सांगोडकर, सरपंच सौं कांताबाई बोरकुटे उपसरपंच विलास बट्टे ग्रा. सदस्य सुनील कुळमेथे सौं संगीता पाल मनीषा कोसरे शितल कोरटवार डिम्पल धोटे सौं बोरकुटे उपस्थित होते. बैठकीमध्ये ठराव घेऊन वन परीक्षेत्र अधिकारी सावली यांना देण्यात आले.सदर ठरवामध्ये शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे नुकसान आणि भविष्यात जीवित हानी होऊ नये याकरिता ग्रा. सदस्य कु. राकेश घोटेकार यांनी वनपरीक्षेत्र अधिकारी सावली यांच्याकडे मागणी केली आहे.



