शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाकरोंडी येथील मुलांना व्यवसायिक अभ्यासक्रमाचे धडे..
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा भाकरोंडी येथील मुलांना व्यवसायिक अभ्यासक्रमाचे धडे
समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत सिग्मा वेबा . प्रा. लिमिटेड यांच्या मार्फत व्यवसायिक अभ्यासक्रम (Electrical power) सुरू करण्यात आला आहे.
भाकरोंडी :-
शासकीय माध्यमिक आश्रम शाळा ता.आरमोरी, जिल्हा – गडचिरोली येथील सत्र 2020-21 पासून इयत्ता नववीतील विद्यार्थ्यांसाठी समग्र शिक्षा अभियाना अंतर्गत सिग्मा वेबा . प्रा. लिमिटेड यांच्या मार्फत व्यवसायिक अभ्यासक्रम (Electrical power) सुरू करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमातून विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानापेक्षा जीवन उपयोगी शिक्षण देऊन त्यांना व्यवसायाभिमुख बनवण्यास मदत होईल या निमित्त्याने दिनांक 23 मार्च 2021 रोजी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एच.आर. भुरे मॅडम व व्यवसायिक प्रशिक्षक श्री. अमोल टेमदेव भाकरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली पोस्टर प्रेझेंटेशन स्पर्धा आयोजित केली होती,
त्यामुळे विद्यार्थ्यांना इलेक्ट्रिक विषयाची चिन्हे, साहित्य यांची माहिती देऊन त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांची स्टेज डेरिंग व आत्मविश्वास वाढावा यासाठी व्यवसायिक प्रशिक्षणाचे धडे देऊन, उत्कृष्ट विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नवनवीन माहिती घेण्याची जिज्ञासा वाटू लागली व विद्यार्थ्यांची शाळेत उपस्थिति वाढून त्यांची व्यवसायिक शिक्षणामध्ये आवड निर्माण होण्यास मदत व्हावी यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली होती .स्पर्धेत प्रशिक्षक म्हणून श्री. बारसागडे सर उपस्थित होते व बक्षीस वितरण मुख्याध्यापिका सौ.एच. आर भूरे मॅडम तसेच शाळेतील इतर शिक्षक कर्मचारी वर्ग यांच्या हस्ते देण्यात आले या व्यावसायिक शिक्षणाचा विद्यार्थ्यांच्या भावी आयुष्यात नक्कीच फायदा होईल व व्यवसाय शिक्षणाने त्यांना आत्मनिर्भर बनण्यास मदत होईल हे नक्कीच.



