मारेगाव येथील स्कॉलर इंटरनँशनल स्कूलच्या वतीने ” होळी पूजन “कार्यक्रम संपन्न..
मारेगाव ( 27 मार्च ) :- येथील स्कॉलर इंटरनँशनल स्कूलच्या वतीने होळी पूजनाच्या कार्यक्रम घेण्यात आले.कोविड19चे नियम लक्षात घेत हा कार्यक्रम अतिशय साध्या पद्धतीने विद्यार्थी व शिक्षकांनी कार्यक्रमाचा आस्वाद घेतला . 
या प्रसंगी होळीचे महत्त्व येथील विद्यार्थी वेद मोरे यांनी आपल्या भाषेत पटवून दिले
व त्याचबरोबर या शाळेचे प्राचार्य म्हणून कार्यरत असलेले उच्चशिक्षित मनु नायर यांनी होळी दहनाचे महत्त्व
अतिशय चांगल्या प्रकारे सर्व उपस्थितांना समजावून दिले.
या कार्यक्रमाला उपस्थित म्हणून शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.



