लालपुलिया येथील कोळसा अपहार प्रकरणात सातही आरोपीला अटक करुन गुन्हा दाखल
★ कोळसा किंमत 3,77,300 रु
★6 जणांची यवतमाळ कारागृहात रवानगी व एकाला पीसीआर ……..
वणी( 19 मार्च ) :- येथील लालपुलिया परिसरात 3 खाजगी कोळसा व्यापारीचा कोल डेपोवर गुरूवारला वणी पोलिसांनी धाड़ टाकली असता . निलजई कोळसा खदान प्रायव्हेट इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनी मधून ट्रकने जाणारा कोळसा लालपुलीया येथे अपहार सुरू आहे. हा अपहार लालपुलिया वणी येथील वर्धमान काटाचे बाजूला असलेल्या कोळसा प्लॉटवर माहितीप्रमाणे
.ट्रक क्रमांक एम .एच 34 ए.बी -54 75, केजीएन कॉल इंटरप्राईजेस लाल पुलिया वणी ट्रकचे क्रमांक MH -34 .AB -3174 एस.के.कोल ट्रेडर्सचे कोङसा प्लॉटवर ट्रक क्रमांक mh 34-AV- 0992 मध्ये निलजई कोळसा खदान मधून प्राइड मेटल इंडस्ट्रीज एमआयडीसी बुटीबोरी नागपूरच्या नावाने असलेले कोडसा लालपुलिया खाली करत असताना मिळून आले.
नमूद रामविलास राम लखन भारद्वाज वय 33 वर्ष,राहणार शास्त्रीनगर घुग्गुस जिल्हा चंद्रपूर,अमरनाथ गयाप्रसाद निशाद वय 28 वर्ष हल्ली मुक्काम बेलोरा चेक पोस्ट,मुकेश कुमार गणेश चौधरी ,हल्ली मुक्काम बेलोरा चेक पोस्ट,इम्रान कमृद्दिन सय्यद वय 42 वर्ष,राहणार उमंग अपार्टमेंट साधन करवाडी वणी,अब्दुल कमिल उर्फ बबलू भाई शेख, वय 52 वर्ष रा .शास्त्रीनगर वणी,सुनील शामराव काळे वय 42 राहणार ,गणेशपुर वणी,
यांनीअटल बिहारी लोकेश्वर आनंद गिरी रा.मंगलम पार्क वणी, वंदना ट्रान्सफर घुगुस चे मालक कुबेर वर्मा व प्राइड मेटल इंडस्ट्रीज एमआयडीसी बुटीबोरी नागपूरच्याचे मालक शाहजाद यांचा सोबत संगनमत एकूण 75..46 टन कोडसा व तीन ट्रक त्यांची एकूण क़ीमत 30 लाख व कोडसा कीमत 3,77,300 असा एकूण मुद्देमाल जप्त करण्यात आला .
अशा प्रकारे कोळशाची अफरातफर करून छुप्या मार्गाने नोकरी करून आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने शासनाच्या नियमाचे भंग केल्याने सदर पोलीस स्टेशन वणी येथे गुन्हा नोंद करून 263/2021 ,379,407,411,34 भा.द.वी कलमान्तर्गत वरील सातही आरोपिना गुन्ह्यात अटक करुन कारवाई करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा. दिलीप पाटील भुजबळ (पोलीस अधीक्षक यवतमाळ ),संजय पुज्जलवार (उपविभागीय पोलीस अधिकारी) ,वैभव जाधव (पोलिस निरीक्षक वणी) यांच्या मार्गदर्शनाखाली
डीबी पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव,शिवाजी टीपूर्णे,सुदर्शन वानोडे, सुनील खंडागड़े,सुधीर पांडे ,रत्नपाल मोहाड़े,हरिन्द्रभारती, पंकज उम्बरकर,दीपक वान्द्रस्वार व पुरुषोत्तम डडमल यांनी केली.



