राजुर येथे लॉकडाऊनचा फायदा घेत जागोजागी खुलेआम अवैद्य दारू विक्री व मटका पट्टी सुरु …..
★राजीव गांधी चौक ते बाज़ारवाड़ी बनले अवैद्यदारू व अवैद्य मटक्याचे माहेरघर…
वणी( 17.मार्च ) :– राजुर येथे लॉकडाऊचा फायदा घेत जागोजागी खुलेआम अवैद्य दारू विक्री सुरु आहे.गावातील हृदय समजले जाणारे म्हणजे चौक.. गावातील अश्या अनेक चौकात अवैध दारू व अवैध मटका धंदे चांगलेच फोफावल्याचे दिसत आहे. महिलांना रस्त्यावर येणे व जाणे करण्यासाठी नाहक त्रास सहन करावे लागत आहे.अवैध दारू व मटक्याने गावात महिलांची सुरक्षितता धोक्यात आहे.
अवैद्य दारू वअवैद्य मटक्यावर कारवाई कधी ?

सायंकाळला बाहेर फिरण्यासाठी जाणे सुद्धा कठीण झाले आहे.सद्या सुरू असलेल्या लॉकडाऊनचा फायदा घेत अवैद्य व्यवसायिक परीसरात सायंकाळी ५ वाजल्या नंतर जागोजागी दारू व्यवसाय सुरू होते.
विशेष म्हणजे या परिसरातील अवैध दारू विक्रेते भरदिवसा दारू दुकाना मधुन दारूचा साठा घरी आणुन जमा करतात आणि सायंकाळी ५ वाजले कि, यांचे दुकान जागोजागी खुलेआम चालु होते. तर दिवसभर जागोजागी मटका पट्टी सुरू असते.
आता महत्वाचा प्रश्न असा की, महिलांनी बाजार रस्त्यावर जायचे नाही का ? प्रशासनाला स्पष्ट सवाल केला आहे. या भागात अवैध व्यवसाय सुरू असुन मात्र या परिसरातील संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष कसे ? असाही प्रश्न उपस्थित केला जात कुणाचातरी आशिर्वादानेच सर्व काही सुरळीत चालू असल्याचे बोलल्या जात आहे.
अवैध्य दारू व्यवसाय करणारे प्रशासनाच्या कारवाईला जराही घाबरत का नाहीत. गावात मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या देशी- विदेशी दारुची राजरोसपणे दारू विक्री होते आहे. या अवैध्य दारू व्यवसायिकांना पोलिस प्रशासनाच्या कारवाईचे जराही भय वाटत नाही का ? आणी वारंवार बातम्या प्रकाशित झाल्यावरही पोलिस प्रशासन पाठपुरावा करीत नाही का ?
अशी स्पष्ट प्रतिक्रिया गावकरी करीत आहे.त्यामुळे आता या परिसराकडे खुद्द ठाणेदाराणेच लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचेही बोलल्या जात आहे..आता प्रशासन राजुर भागाकडे अवैद्य व्यवसायींकासाठी काय भूमिका घेईल .हे बघणे गरजेचे…!



