Vidarbh24News

Latest Online Breaking News

भारतीय जनता पार्टी व वणी व्यापारी आघाडीने कोविड-19 लसीकरण केंद्र जास्तीत जास्त सुरु करण्यासाठी जिल्हाधिकारी यांना घातले साकडे 

वणी (15. मार्च):- कोविड 19 लसीकरण केंद्र जास्तीत जास्त सुरु करण्यासाठी वणी येथील भारतीय जनता पार्टी व भाजपा व्यापारी आघाड़ीने आज दिनांक 15 मार्च 2021 ला वणी उपविभागीय अधिकारी व वणी विधानसभा आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचा मार्फ़त यवतमाळ जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले.सविस्तर वृत्त असे की,वणी शहर व संपूर्ण तालुक्यामध्ये दिवसें-दिवस कोरोनाची पॉझीटीव रुग्णाच्या संख्येत वाढ होत आहे.

केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या नव्या पत्रकानुसार आता खासगी रुग्णालयात लसीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे.वणी शहरात ग्रामीण रुग्णालयात covid-19 केंद्र सुरू आहे.परंतु लसिकरण सेंटर एकच असल्यामुळे प्रचंड प्रमाणात गर्दी होत आहे.त्यामुळे सामान्य जनतेला मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे.त्याकरिता भारतीय जनता पार्टी वणी शहर व व्यापारी आघाडीचे पदाधिकारी व सदस्य यांनी एकत्र येऊन जनतेचा विचार लक्षात घेतला व व्यापारी व सामान्य जनतेसाठी स्वतंत्र कोविड -19 लसीकरण केंद्र वणी शहरात आपण तातडीने एकापेक्षा अधिक सेंटर निर्माण करण्यात यावे ,यासाठी भारतीय जनता पार्टी वणी शहर व व्यापारी आघाडीचे पदाधिकारी व सदस्य यांनी निवेदन दिले. निवेदन देत असतांना प्रमुख उपस्थिति रवी बेलुरकर (जिल्हा महामंत्री भाजपा ),श्रीकांत पोटदुखे (शहर अध्यक्ष भाजपा)

 

लवलेश लाल (शहर अध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी) ,रवी रेभे ( वणी शहर उपाध्यक्ष भाजपा व्यापारी आघाडी) , संदीप मदान( सरचिटनिस),सुधीर साळी,अनिल आकेवार, (सचिव) नितीन बिहारी,गुलशन खुराणा,आशीष जैन (कार्यकारिणी सदस्य) राजू तिवारी, राहुल लाल, हितेन अटारा,अमोल वैद्य, लक्ष्मीनारायण लोया, दीपक जैन, रवी फेरवानी, होमेश पांडे, अनुप राठी, संतोष भेले, अवि दोडके, सुनील मत्ते,उज्ज्वल पांडे, कल्पेश पटेल, यश जोबनपुत्रा, उपस्थित होते.

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!