पं.स.सभापती अल्काताई आत्राम यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. प्राथमिक शाळा भिमणी येथे नोटबुक वितरण.
पोंभूर्णा पं. स. सभापती कु.अल्काताई आत्राम यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आज दि. 13 मार्च ला ग्रा.पं.सदस्य तथा माजी सरपंच रणजीत पिंपळशेंडे यांच्या हस्ते जि.प. उच्च प्राथमिक शाळा भिमणी येथे विद्यार्थ्यांना नोटबुक वितरण करुन अल्काताई आत्राम यांचा वाढदिवस उत्साहात साजरा करण्यात आला.
या वितरण सोहळ्या प्रसंगी भिमणी येथील संतोष गेडाम ग्रा. पं. सदस्य, रामदास मांडवगडे अध्यक्ष शा.व्य. समिती,विकास आत्राम, विशाल नानगिरवार, यांची प्रामूख्याने उपस्थिती होती. सुत्रसंचालन दहीवले सर यांनी तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक दिवसे सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शेडमाके सर, गेडेकर मॅडम, व रामटेके मॅडम यांनी अथक परिश्रम घेतले.



