Vidarbh24News

Latest Online Breaking News

*शेतमजुराचा मुलगा ‘निरज ढोंगे’ देशसेवेसाठी*

*शेतमजुराचा मुलगा ‘निरज ढोंगे’ देशसेवेसाठी*

*आई वडिलांचे स्वप्न स्वाकार*

पोंभुर्णा प्रतिनिधी :-घरची परिस्थिती हलाकीची जेमतेम २ एकर शेती, घरच्यांवर शिक्षणासाठी काढलेले कर्ज,मोठा भाऊ आर्मीत लागल्यामुळे घरची परस्थिती बदलणार या विचारात असताना वडिलांचे निधन झाले.
अशा स्थितीत *निरज मनोहर ढोंगे* जिद्द आणि चिकाटीने मिळवलेले यश प्रेरणादायी आहे.
निरज चे प्राथमिक शिक्षण मुल तालुक्यातील मूळ जन्मगावी पिपरी दिक्षित ला झाले. महाविद्यालयीन शिक्षण मूल येथे झाले. अशातच परिस्थिती हातावर आणून पानावर खाणे अशी असल्यामुळे पुढील पदवी शिक्षण यशवंतराव मुक्त विद्यापिठातून शेती सांभाळत व मजुरी करत मिळवली.
मोठा भाऊ सुरज ढोंगे इंडियन आर्मीत दाखल झाल्यामुळे घरात आनंदाचे वातावरण होते.
कुटुंबात आई-वडील दोन भाऊच असल्यामुळे गोड स्वप्न रंगवू लागली, स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल असताना, नशिबात जे व्हायचे असते ते घडत असते म्हटल्याप्रमाणे वडिलांचा २०१९ मध्ये दुर्दैवी अपघाती मृत्यू झाले.
त्यात आईची तब्बेत साथ देत नव्हती, घरची जबाबदारी निरजवर आली. भरतीचा सराव सोडून शेती सोबत जो मिळेल ते काम करून उदरनिर्वाह करू लागला.
पण म्हणतात न हातावरच्या रेषा बदलवायच्या असतील तर नशीब असावे लागते, याच शब्दांवर विश्वास ठेवून निरज ने भरती चा सराव सोडला मात्र आत्मविश्वास,जिद्द,प्रयत्न सोडले नव्हते.
निरज पुन्हा सीआरपीएफ ची भरतीत उत्तरला व फिजिकल दिली 20 फेब्रुवारी 2021ला निकाल लागला, त्यात *निरज* ची निवड झाली. त्याच्या मेहनतीला यश प्राप्त झाले.
मिळालेल्या यशाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत असून यशाचे श्रेय आई, छोटा भाऊ व स्व.वडिलांना दिले आहे.

(निरज मत)
आई वडीलांचे कष्ट व त्याग डोळ्यांपुढे होते. अनेकदा भरतीत अपयश आले. तरीपण मनात आत्मविश्वास व जिद्द असल्यामुळे यश मिळवता आले.
निरज ढोंगे

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!