Vidarbh24News

Latest Online Breaking News

नागेपल्ली येथे नियमित ग्रामसेवक देण्यात यावे नवनियुक्त सरपंच आणि सदस्य याची मागण

नागेपल्ली येथे नियमित ग्रामसेवक देण्यात यावे नवनियुक्त सरपंच आणि सदस्य याची मागण            10 मार्च 2021 रोजी अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्रामपंचायत येथील सर्व ग्राम पंचायत सदस्य व सरपंच यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती,अहेरी यांना निवेदन दिले. निवेदनात असे मटले आहे की, अहेरी तालुक्यातील नागेपल्ली ग्राम पंचायत लोकसंख्येच्या दृष्टीने मोठी ग्राम पंचायत असुन यामध्ये 7 गावे मोडत असुन जवळपास 7999 इतकी लोकसंख्या आहे. दररोज कितीतरी नागरिक या कार्यालयात कामानिमित्त येतात परंतु येथील ग्राम विकास अधिकारी, एल. के. पाल असून त्यांना कमलापुर ग्राम पंचायत येथील अतिरिक्त पदभार दिल्याने ग्राम पंचायत नगेपल्ली येथे नियमित सेवा देण्यास त्यांना अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी नियमित ग्रामसेवक नसल्याने विविध विकास कामे लोकांचे अडून आहेत या सर्व बाबींचा विचार करून ग्राम पंचायत नगेपल्ली येथे नियमित ग्रामसेवक देण्यात यावे असे निवेदन देऊन चर्चा करण्यात आले. व निवेदनाच्या प्रतिलिपी जि. प. अध्यक्ष, गडचिरोली, मा. आमदार अहेरी विधानसभा क्षेत्र, आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जी. प. गडचिरोली यांना पाठविण्यात आले. निवेदन देतानी ग्राम पंचायत नगेपल्ली चे नवनियुक्त सरपंच श्री. लक्ष्मण आर. कोडापे उपसरपंच श्री. रमेश शानगोंडावार ग्रा. प. सदस्य फेलिक्स गीध, राकेश कुळमेथे, आशिष पाटील, मल्लारेडी येमनुरवार ,राहुल सिडाम, ममता मडावी, अंजनाताई पेंदम, बेबी मंडल, करिश्मा आत्राम, लक्ष्मीबाई सीडाम, ज्योती ठाकरे, शेवंता भोयर, स्मिता निमसरकार ग्रा. प. सदस्या उपस्थित होते

Facebook Page

LIVE Cricket

लाइव कैलेंडर

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  

LIVE FM सुनें

Polls

क्या आप मानते हैं कि कुछ संगठन अपने फायदे के लिए बंद आयोजित कर देश का नुकसान करते हैं?

View Results

Loading ... Loading ...
error: Content is protected !!