खाजगी शाळेत मोफत (RTE) प्रवेशाची ऑनलाईन प्रक्रिया सुरु……

वणी (5.मार्च ) :- गरीब व हुशार विद्यार्थ्यासाठी खाजगी शाळेत मोफत प्रवेश मिळावा म्हणून दरवर्षी महाराष्ट्र शासनातर्फे तर्फे २५ टक्के मोफत प्रवेश दिला जातो. मोफत प्रवेशासाठी सन २०२१-२२ या वर्षीसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु झाली आहे. तरी जास्तीत जास्त पालकांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे जिल्हापरिषदेकडून सूचित केले आहे.
बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधील कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विना अनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थांसाठी राखीव ठेवण्याची तरतूद आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा २०२१- २२ या वर्षासाठी मोफत आरटीई २५ टक्के प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबविण्यात येत असून जिल्ह्यातील शाळांचे ऑनलाईन रजीस्टेशन जास्तीत जास्त पूर्ण होणे आवश्यक आहे. तरी ०३/०३/२०२१ ते २१/०३/२०२१ या कालावधीमध्ये पालकांनी ऑनलाईन अर्ज भरावे.
आवश्यक कागदपत्रे- वडिलाचा उत्पन्न दाखला , वडिलाचा आधार कार्ड, वडिलाचे जात प्रमाणपत्र, मुलाचा जन्माचा दाखला, मुलाचा आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे घेणून नजीकच्या ऑनलाईन सेवा केंद्रात जाण्याचे करावे व आपल्या पाल्याचे मोफतमध्ये शिक्षण करून घ्यावे.