राजूर येथील मुलीने गळफास घेऊन संपविली जीवनयात्रा…….
वणी (4. मार्च ):-तालुक्यातील राजूर येथील तेरा वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल दि 3.3.2021 रोज बुधवार सायंकाळी रात्री6.30 ते 7.00 च्या दरम्यान उघड़कीस आली.कु.खुशी इंदर केवट रा. राजूर, ता-वणी असे मृत मुलीचे नाव आहे.
मुलीचे वडील इंदल रामसजीवन केवट या फिर्यादीचा तक्रारीनुसार वणी पोलिसांनी आकस्मिक मृत्युची नोंद केली आहे.
त्यांचा म्हणन्यानुसार त्यांची लहान मुलगी कु.खुशी इंदल केवट हिने बुधवारी सायंकाळी 6.30 ते 7.00 च्या दरम्यान घरी कुणी नसल्याची संधी साधुन ओढ़णीने गळफास घेतली व जेव्हा कामावरुन घरचे सर्व आले असता त्यांनी तिची ती स्थिति बघितली असता ,
तिला खाली उतरविले व ग्रामीण रुग्णालयात आणले असता तिला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मुलीच्या वडिलाचा फ़िर्यादीवरुन पोलिसांनी कलम 174 सीआरपीसी अन्वव्ये गुन्हा दाखल केला आहे . प्राथमिक तपास वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनात एएसआय कांबळे करीत आहे



