मारेगावाचे बीडीओ पांडे यांची यवतमाळला बदली
— कृषि अधिकारी संजय वानखेडे यांचे कडे पदभार
मारेगाव (3.मार्च ):– मारेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रभाकर पांडे यांची यवतमाळ येथे बदली करण्यात आली असुन येथे पंचायत समितीचे क्रुषी अधिकारी संजय वानखेडे यांचे कडे पदभार सोपविण्यात आला आहे.मारेगाव पंचायत समितीचा ढेपाळलेला कारभार सुरळीत करण्यासाठी यवतमाळ येथील डीआरडी मध्ये कार्यरत असलेले अनुभवी अधिकारी प्रभाकर पांडे यांना मारेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाची धुरा सोपविण्यात आली होती.
तत्कालीन गटविकास अधिकारी सुनील तलवारे यांच्या सेवानिव्रुतीने रिक्त झालेल्या या पदासाठी यवतमाळ येथील डिआरडीमध्ये कार्यरत असलेले अनुभवी अधिकारी प्रभाकर पांडे यांना येथील पंचायत समितीचा प्रशासकीय कारभार सोपविण्यात आला होता. शिस्तप्रियतेची ओळख निर्माण करणाऱ्या पांडे यांचेवर मुख्यालयी राहात नसल्याचा ठपका ठेवण्यात येवुन त्यांच्या उचलबांगडीचा प्रस्ताव पाठविण्यात आला होता. त्यामुळे स्थानिक पदाधिकाऱ्यांचा असंतोष क्षमविण्यासाठी त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असुन ते कार्यरत असलेल्या डी आर डी या जुन्याच कार्यालयाचा कारभार सोपविण्यात आला आहे.येथील गटविकास अधिकारी या पदावर येथील क्रुषी विभागात कार्यरत असलेले क्रुषी अधिकारी संजय वानखेडे यांचेकडे गटविकास अधिकारी पदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.