इकोप्रोच्या आंदोलनाला “माहिती अधिकार,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचा” पाठिंबा..

इकोप्रोच्या आंदोलनाला ” माहिती अधिकार,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचा पाठिंबा..
मा. जिल्हाधिकारी साहेब व मा. आयुक्त साहेब चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर यांना सादर केला पाठिंबांचे निवेदन.
महाराष्ट्र अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्हा अध्यक्ष व पदाधिकारी यांनी घेतली बंडू धोत्रे यांची भेट.
चंद्रपूर:- (दिनांक 1मार्च )- मागील काही दिवसांपासून येथील इकोप्रो या सामाजिक संघटनेने शहराच्या मध्यभागी असणाऱ्या ऐतिहासिक रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी कंबर कसली असून इकोप्रो चे संस्थापक अध्यक्ष बंडू धोत्रे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाला माहिती अधिकार,पोलीस मित्र व पत्रकार संरक्षण सेना, महाराष्ट्रा प्रदेश अध्यक्ष मा.श्री. तुळशिराम जांभूळकर साहेब, महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष- अरुण माधेशवार, महाराष्ट्र राज्य प्रसिद्ध प्रमुख – करण कोलुगुरी, विदर्भ महिला अध्यक्ष सौ. शिल्पा बनपूरकर, विदर्भ महिला उपाध्यक्ष सौ. नेत्रा इंगुलवार, विदर्भ महिला संघटक सौ. आरती आगलावे, विदर्भ संपर्क प्रमुख सौ. संगीता कार्लेकर व विदर्भ सह संघटक सौ. सरीता मालू महाराष्ट्रा सह विदर्भ आणि चंद्रपुर जिल्हा पदाधिकारी यांनी पाठिंबा जाहीर केला आहे. या सेनेच्या शिष्टमंडळाने या संदर्भात धोत्रे यांचेशी सविस्तर चर्चा करून स्थिती जाणून घेतली, त्या अगोदर महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा. तुळशिराम जांभूळकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली मा. जिल्हाधिकारी गुल्हाने साहेब,चंद्रपूर व मा. आयुक्त साहेब- चंद्रपूर महानगरपालिका चंद्रपूर यांना माहिती अधिकार,पोलिस मित्र व पत्रकार संरक्षण सेनेचा पाठिंबा असल्याचा निवेदन सादर करण्यात आले. त्यावेळी चंद्रपूर जिल्हा अध्यक्ष विजयकुमार विश्वकर्मा, चंद्रपूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री राजेंद्र मेश्राम, चंद्रपूर जिल्हा महिला उपाध्यक्ष – सौ.आशा देशमुख, चंद्रपूर जिल्हा महिला संघटक जास्मिन शेख, चंद्रपूर जिल्हा महिला सचिव प्रगती पडगेलवार , चंद्रपूर जिल्हा महिला संपर्कप्रमुख सौ. मीना यादव, चंद्रपूर जिल्हा महिला सरचिटणीस सौ रंजना काटकर , रंजना नाकतोडे तसेच नवनियुक्त पदाधिकारी.. यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. त्यावेळी श्री. बंडू धोत्रे यांनी भेटी दरम्यान हा तलाव मनपाच्या अखत्यारीत येत नाही या कडे लक्ष वेधत तलावात सोडल्या जाणाऱ्या सांडपाण्याच्या प्रश्नासाठी ५० लक्ष रु निधी उपलब्ध करून द्यावा अश्या मागणीचे निवेदन यासाठीच्या जुन्या पत्रांचा संदर्भ देऊन सादर केले आहे असे या शिष्टमंडळाला धोत्रे यांनी भेटी अंती सांगितले. यावर चर्चा करतांना बंडू धोत्रे यांनी रामाळा तलावाच्या संवर्धनासाठी जिल्हा प्रशासन, रेल्वे,पुरातत्व विभाग, वेकोली ,प्रदूषण मंडळ व मनपाच्या समन्वयाची गरज असल्याचे प्रतिपादित केली. खनिज विकास निधीतून सर्व कामे होऊ शकतात.याकडे त्यांनी लक्ष वेधले.माझे आंदोलन कुणाच्या विरोधात नसून जनतेच्या आरोग्यासाठी आहे. जनतेला ज्या दिवशी हे कळेल तेव्हा शासनाचे डोके ताळ्यावर येईल.असे ते म्हणाले.
सन २००८ पासून हा लढा सुरू आहे. आता सहनशक्ती संपली.तलावातील सांडपाण्यामुळे भूगर्भातील पाणी देखील प्रदूषित होत आहे. मासोळ्या पाण्यात नाही तर वर येऊन श्वास घेताना दिसतात. तलाव नष्ट होण्याच्या मार्गावर आहे .अशी माहिती त्यांनी दिली.