स्कॉलर्स इंटरनॅशनल स्कूल मारेगावच्या वतीने मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा
मारेगाव (1.मार्च):– स्कॉलर इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने मराठी राजभाषा दिन व राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यात आला.सर्वप्रथम कोव्हीड -19 चा नियमाचे पालन करून प्राचार्यांनी कवी कुसुमाग्रज व शास्त्रज्ञ सी.वी.रमन यांच्या प्रतिमेला हार अर्पण करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी कु.फाल्गुनी धोटे,कु.सानिया मेश्राम व मरुत लिंगावर यांनी राजभाषाचे महत्व कविता व विज्ञानावर प्रकाश टाकला.
या कार्यक्रमाला प्राचार्य.मनु नायर व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होते.