पुन्हा लॉकडाऊनच्या भीतीने परराज्याचे मजूर वणी येथून परतीच्या मार्गावर………
-” चलो चले मितवा अपने गाँव……” मजूरवर्गाची हाक
वणी (1.मार्च) :- कोरोनाचा पुन्हा प्रादुर्भाव वाढण्यास प्रारंभ झाल्यानंतर वणी येथे परराज्यातून आलेले मजुरांनी अर्धवट काम सोडून पुन्हा लॉकडाऊन …….या भीतीमुळे स्व-गावाची आस लागल्याने मिळेल त्या वाहनाने जसेच्या तसे गावाकडे रवाना होताना दिसत आहे.
त्यांना ” विदर्भ 24न्यूज वणीचा प्रतिनिधिने विचारले असता त्यांचे म्हणणे एकच आहे की,लॉकडाउन के वजह से काम बराबर नही मिल रहा है और कोई भी जमा पूंजी नही कर पा रहे है,और पिछले साल जैसे इसी महीने में कोरोना महाराष्ट्र आया अभी भी वोई हालत होगी “.मागील वर्षी २०२० मध्ये याच महिन्यात गावाकडे जाण्यास किती हाल व निष्ठा सहन कराव्या लागल्यात याचे ते स्वतः साक्षीदार असल्याने आता ती पाळी आपल्यावर येऊ नये म्हणून त्यांनी हे पूर्व तयारी केल्याचे दिसून येत आहे.अनेक राज्यातून हजारो नागरिक वणीत रोज़गारासाठी विटबट्टी,चूनाभट्टी व कोळसा प्लॉट वर मात्र कोविड १९ च्या मागील वर्षाचा अनुभवानंतर यावर्षात सुद्धा महाराष्ट्र राज्यात फेब्रुवारी महिन्यात वाढते रुग्ण पाहून राज्य सीमा बंद होतील की क़ाय ? या अडचणीत सापडून आपले काम अर्धवट सोडून मजूर स्व-गावास जाण्यासाठी मिळेल त्या वाहनाने प्रवास करून आपले स्व-गृही परतत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
स्थानिक पातळीवर मजुरांना पुरेशी कामे मिळत नसल्याने मागील वर्षीपासून मजुरांच्या नशिबी हालअपेष्टा होत आहेत. वारंवार लॉकडाउनने मजूरवर्ग खुप धास्ताविला आहे. त्यामुळे आता स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून घ्यावा. अशी इच्छा मजुरांनी दर्शविली आहे.