अहो साहेबांनो !! वणीत लॉकडाऊन की फक्त शेटरडाऊन ?
वणी (27 फेब्रू ) :- संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात कोरोनाचे थैमान घातले आहे. वणीतही कोरोनाच्या विषाणूंचा संसर्ग बाबत भीतीचे सावट असून नागरिकांमध्ये बचावाबाबत शासन प्रशासनाकडून विविध उपाययोजना सोबतच जनजागृतीवर मोठ्या प्रमाणात भर देण्यात येत आहे.
दररोज वणी शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत आहे.परंतु जिल्हाधिकार्यांनी विशेष संचारबंदी लागू केली आहे .त्याचे पालन वणीत शहरात होताना दिसून येत नाही.शनिवारी सायंकाळी 5 ते सोमवार सकाळी 9 वाजेपर्यंत संचारबंदी आदेश देण्यात आलेला आहे.परंतु पहिल्याच सायंकाळी वणीत काही दुकाने रात्री आठ वाजेपर्यंत सुरुच दिसून आले आहे.याचा अर्थ शासनाने दिलेल्या आदेशाची पायमल्ली वणीत होताना स्पष्ट दिसत आहे. यवतमाळ जिल्ह्यात दररोज वेळेचे बंधन असताना सुद्धा सर्वत्र दुकाने वणी शहरात काही बंद तर काही चालू अशी स्थिती निर्माण झालेली आहे.याचा अर्थ गरिबांनी पाच वाजता दुकान बंद करायचे का आणि पैसे वाल्यांनी मात्र अर्धे शेटर बंद करून बसायचे का?असा नाराजीचा सूर या वणी शहरात लोकांकडून ऐकायला भेटत आहे.लॉकडाउन फक्त गरीब वर्गासाठी लागू का ?शटर बंद केल्याने लॉकडाउन होतो का ? मोठमोठ्या व्यापाऱ्यांची दुकाने अर्धे बंद व अर्धे सुरू अशा परिस्थितीत दिसून येत आहे. तरीही प्रशासन लक्ष का देत नाही ? असा सवाल वणी शहरात नागरी करत आहे. वणी प्रशासनाला जिल्हाधिकाऱ्यांने दिलेले आदेश माहित असून सुद्धा त्याकडे कानडोळा का करत आहे ?असे अनेक प्रश्न संचारबंदीचा पहिल्याच रात्री दिसून आला आहे.वणी शहरात प्रशासनाने आता तरी कठोर पाऊले उचलून मोठ्- मोठ्या व्यापारांकड़े जास्तीत जास्त लक्ष देण्याची गरज आहे.वणी प्रशासनाचा चोप फक्त गरीब दुकानदारांनाच का ?
आज वणीत लॉकडाऊन हा नाममात्र झालेला दिसून आला आहे. काही दुकाने तर महाराजांसारखे चालू असल्याचे चित्र दिसुन आले.चिखलगाव भागात कोळसा व्यापाऱ्यांचे ऑफिस चालू,लालपुलिया भागात हॉटेल चालू ,वर्कशॉप सुरु नेमके प्रशासन करत काय आहे .त्यांचे कर्तव्य गेले कुठे ?
हेच वणीकरांना कळत नाही आहे.आता तरी प्रशासन कडक पाऊले उचलेल का ? कि मात्र गरिबांचे दुकाने बंद करण्यासाठीच धावा करेल .वणी प्रशासन येणाऱ्या दिवसात कोणते पाऊल उचलनार ? आता तरी कड़क होईल का वणी प्रशासन ? असे अनेक प्रश्न त्यांचा सामोर उपस्थित झाले आहे …… ……..